मुंबई : धर्मापेक्षा विमानतळाची सुरक्षा ही महत्त्वाची असून कोणत्याही धार्मिक अथवा अन्य कारणासाठी तडजोड होऊच शकत नाही. असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने विमानतळ परिसरात रमजाननिमित्त नमाज पठण करण्याची मागणी फेटाळून लावली. न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने अखेर सुरक्षेच्या कारणास्तव याचिका निकाली काढली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील तात्पुरत्या शेडमध्ये रिक्षा-टॅक्सी […]Read More
मुंबई, दि. ६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा 2026–27 चा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये नागपूर आणि परिसराच्या विकासाबरोबरच मनोरंजन क्षेत्रासाठीही मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबरोबरच महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नव्या […]Read More
मुंबई, दि. ६ : T-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान विशेष सुपरफास्ट गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सामना पाहण्यासाठी मुंबई आणि गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवास पर्याय उपलब्ध […]Read More
बंगळुरू, दि. ६ : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याचा १७ वा अर्थसंकल्प आज सादर केला. या दरम्यान त्यांनी १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर प्रतिबंध आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. लहान मुलाच्या स्क्रीन टाइम आणि सोशल मीडिया वापरावर तर चर्चा होतच असतात. परंतू यावर प्रतिबंध आणण्याचा देशातील पहिलाच निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. कर्नाटक विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात […]Read More
मुंबई, दि. ६ : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाची आता विशेष दखल घेतली जाणार आहे. दरवर्षी लाडकी कर्मचारी बहीण म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेविका दीक्षा कारकर यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेमला मंजुरी देत सभागृहात यावर एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छता मोहिमेत […]Read More
मुंबई, दि. ६ : नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांना समान नियम लागू केले असून संबंधित शाळांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. शिक्षण विभागाचे याबाबतचे परिपत्रक जारी झाले आहे. पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादेचे निकष अधिक कठोर […]Read More
मुंबई, दि. ६ : इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या भीषण युद्धाला आता आठवडा होत आला. यामध्ये आता जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकाबाजूला श्रीमंत अमेरिका, तंत्रज्ञान कुशल इस्राईल आणि दुसऱ्या बाजूला खनिजतेलाने समृद्ध इराण यांमध्ये कोणाची बाजू घ्यावी असा पेच जगातील बहुतांश देशांसमोर आहेत. अशास्थितीत श्रीलंकेने उघडपणे इराणची बाजू घेतली आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ […]Read More
नवी मुंबई, दि ६ : वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल येथील सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. समीर काळे आणि त्यांच्या टीमने ६४ वर्षीय रुग्णाच्या मेंदूतील ‘स्फेनोइड विंग मेनिन्जिओमा’ नावाची मोठी गाठ काढून वैद्यकीय क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली आहे. या रुग्णाच्या मेंदूतून ७०० ग्रॅम स्फेनोइड विंग मेनिन्जिओमा गाठ काढण्यात आली. खारघर येथील ६४ वर्षीय रुग्ण गणेश यादव (नाव […]Read More
मुंबई, दि. ६ – भांडुप पश्चिम स्टेशन रोडवर अनेक समस्या उद्भवत असून प्रवाशांना चालण्यासाठी सुटसुटीत रस्ता मिळत नसल्याने त्यांना रिक्षा व बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच स्टेशन परिसरात होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करता यावी, यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या […]Read More
मुंबई दि ६ : राज्यातील सुमारे 30 लाख शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी देणारा आणि चार स्तंभांतर्गत 16 उपक्षेत्र निश्चित करणारा तुटीचा अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केला. यात चाळीस हजार 552 कोटी रुपयांची महसुली तूट दर्शवण्यात आली आहे. तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित करणारा […]Read More