Month: March 2026

सांस्कृतिक

नटश्रेष्ठ अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीत रंगणार ‘सुभेदार

मुंबई दि १४ : मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जपणारी नामवंत संस्था ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ गेल्या अनेक दशकांपासून दर्जेदार नाटकांची निर्मिती करत आहे. हीच परंपरा जपत संस्थेने रंगभूमीवर सादर केलेले “सुभेदार गेस्ट हाऊस” हे नाटक सध्या रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात यशस्वी वाटचाल करत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या नाटकाचा २५ वा (रौप्यमहोत्सवी) प्रयोग अत्यंत दिमाखात […]Read More

महानगर

ठाणे – बोरिवली बोगद्याचा वाद न्यायालयात

मुंबई : ठाणे- बोरिवली या शहरांमधील अंतर कमी करणारा बोगदा आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या ठाणे ते बोरिवलीदरम्यानच्या दुहेरी भुयारी बोगद्यांच्या कामासाठी स्थापन केलेल्या रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पामुळे ठाणेस्थित हावरे सिटी टाऊनशिप परिसरात वायू प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या दाव्याची उच्च न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली. […]Read More

ट्रेण्डिंग

LPG च्या अखंडीत पुरवठ्याची केंद्र सरकारकडून हमी

नवी दिल्ली, १३ मार्च : घरगुती LPG (स्वयंपाकाचा गॅस) चा अखंडित पुरवठा करण्यात येईल अशी हमी देत नागरिकांनी सिलिंडर्ससाठी घाबरून जाऊन बुकिंग करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. असे आज केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. माध्यमांना माहिती देताना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, ५ मार्चपासूनच LPG चे देशांतर्गत उत्पादन ३० टक्क्यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे

मुंबई, दि. 13 : WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta कडून नवीन अॅण्‍टी-स्कॅम फिचर्सच्या लॉन्चिंगची घोषणा करण्यात आली आहे या नवीन अॅण्‍टी-स्कॅम टूल्समध्ये व्हॉट्सअॅपवर डिवाइस लिंकिंग वॉर्निंग, फेसबुकवर संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्टबद्दलचे अलर्ट आणि मेसेंजरवर प्रगत स्कॅम डिटेक्शन यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. संशयास्पद वाटणाऱ्या अकाऊंटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता किंवा अशा अकाऊंटकडून रिक्वेस्ट येते तेव्‍हा […]Read More

महानगर

सावधान, गॅस नोंदणीच्या नावाखाली ४ लाख रुपयांची फसवणूक

मुंबई, दि. १३ : घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे चिंताग्रस्त असलेल्या नागरिकांना आता सायबर गुन्हेगारांच्या फसवणूकीलाही सामोरे जावे लागत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून महानगर गॅस लिमिटेड (MGL) चे कर्मचारी असल्याचे भासवून दोन महिलांची सुमारे ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला […]Read More

शिक्षण

मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप

मुंबई, दि. १३ : गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पोषण आहार देणे शक्य झाले नसल्याने केळी, सफरचंद अशी फळं देण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी दिली. मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या १४७ महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळांतील ५.४० लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाला मुकावे […]Read More

महिला

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मासिक पाळीत पगारी रजेची याचिका

नवी दिल्ली, दि. १३ : सर्वोच्च न्यायालयात आज देशभरातील विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना मासिक पाळीदरम्यान सशुल्क रजा देण्याच्या मागणीवरील याचिक सुनावणी झाली. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान मासिक पाळीच्या रजेला अनिवार्य करण्याच्या संभाव्य सामाजिक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या अधिकार क्षेत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, या […]Read More

महानगर

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी सैनिकांची नियुक्ती करा,

मुंबई, दि १३विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी सैनिकांची नियुक्ती आणि शहीद किंवा अकस्मित मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या पाल्यांना किंवा पत्नीला अनुकंपा तत्त्वावर एक सरकारी नोकरी द्यावी या मागणीसाठी एल्गार सैनिक एकता मंच महाराष्ट्र यांच्या वतीने आझाद मैदान येथे नुकतेच आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने माजी सैनिक सहभाग घेत आहेत.मागील एक वर्षापासून […]Read More

राजकीय

सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर

मुंबई दि १३: राज्यात आमिष दाखवून, दिशाभूल करून किंवा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना वेसण घालण्यासाठी राज्य सरकारने आज विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, २०२६’ सादर केले आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार, बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या दोषीस सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची कठोर तरतूद करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. पुढील […]Read More

राजकीय

अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान गैरहजर सचिवांवर कारवाईचे अध्यक्षांचे निर्देश

मुंबई दि १३ : अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांच्या आजच्या विभागांच्या चर्चेदरम्यान कोणकोणत्या विभागांचे प्रधान सचिव अथवा अतिरिक्त मुख्य सचिव सभागृह अधिकारी गॅलरीत गैरहजर होते, त्यांच्यावर काय कारवाई केली याचा अहवाल सोमवारी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आपल्याला सदर करावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत विधानकार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. अशा प्रकारे चर्चा सुरू असताना संबंधित […]Read More