Month: March 2026

महानगर

विक्रोळी येथील विकास मराठी शाळेचा कृतीयुक्त शिक्षणाचा प्रयोग सहप्रवास २०२६

मुंबई, दि १६: विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास हायस्कूल मराठी शिशु विभाग, मराठी प्राथमिक व माध्यमिक विभाग (सेमी-इंग्रजी माध्यम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहप्रवास २०२६’ या मराठी भाषा व माध्यमाच्या संवर्धनासाठी आयोजित कार्यक्रमाचे सादरीकरण विक्रोळी येथील शालेय सभागृहात शेकडो पालकांसमोर नुकतेच करण्यात आले.विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा स्नेहमेळावा, सहप्रवास असणाऱ्या या कार्यक्रमात संस्थेच्या विश्वस्त श्रीम.माधवी […]Read More

राजकीय

सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट

मुंबई दि १६ : आज विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेल्या शक्तीने धर्मांतरण विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याचे पहायला मिळाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधेयकाला पाठिंबा दिला, तर काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने या विधेयकाला विरोध केल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. सक्तीने धर्मांतरण विरोधी विधेयक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत […]Read More

राजकीय

बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान….

मुंबई दि १६ : विविध प्रकारची अमिषे, जबरदस्ती, लबाडी, फसवणूक, धमकी आणि अल्पवयीन पद्धतीने केलेल्या बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्यासाठी सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयक राज्याने आणले असून या विधेयकाबद्दल अनेक अफवा आहेत, मात्र कायद्याच्या कसोटीवरच हे विधेयक सादर करण्यात आलं आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडली. 1968 सालापासून देशातल्या अनेक […]Read More

महानगर

निवृत्त सहसचिव गो.श्री.पंतबाळेकुंद्री यांचे निधन

मुंबई दि १६ : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो.श्री.पंतबाळेकुंद्री यांचे आज (सोमवार १६ मार्च २०२६) ठाणे येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्यावर उद्या सकाळी अकरा वाजता ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. एके […]Read More

राजकीय

अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही ~ रामदास

जम्मू, दि १६~ अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल.मात्र आतंकवाद संपवण्याची पाकिस्तानची ईच्छा नाही.पाकिस्तान अतिरेक्यांना पाठबळ देत आहे.अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची कधीही मैत्री होणार नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले.जम्मू येथील आमंत्रण रिसॉर्ट हॉल येथे महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड […]Read More

राजकीय

BHMS डॉक्टरांना alopathy व्यवसायाची परवानगी नाही

मुंबई दि १६ : राज्यातील ग्रामीण भागात आवश्यक असणारे MBBS डॉक्टर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यामुळे BHMS डॉक्टरांना रुग्णांवर केवळ alopathy औषधोपचार करण्यासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्यांना alopathy चा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिली. अशी परवानगी देणे […]Read More

विदर्भ

अवकाळी पावसामुळे गहू विक्रीसाठी शेतकऱ्यांची धांदल

वाशिम दि १६ : हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजामुळे वाशीम जिल्ह्यात गहू विक्रीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पहायला मिळत आहे . पहाटेपासून वाशीम आणि कारंजा बाजारात समितीमध्ये गव्हाची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे . हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गहू काढणी आणि विक्रीसाठी मोठी लगबग सुरू केली आहे. पावसामुळे तयार गव्हाचे नुकसान होऊ […]Read More

साहित्य

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी योगेश सोमण

पुणे दि १६ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळाचे साहित्य संवर्धन आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवून सत्ताधारी परिवर्तन उत्कर्ष पॅनलचा पराभव केला. साहित्य परिषदेच्या तीन प्रमुख पदांवर साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण (अध्यक्ष), स्वाती महाळंक (प्रमुख कार्यवाह) आणि प्रदीप निफाडकर ( कोषाध्यक्ष) यांनी विजय मिळवला. शहर कार्यवाहपदाच्या निवडणुकीत सातपैकी चार जागांवर साहित्य संवर्धन […]Read More

विदर्भ

विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गिरीश गांधी विजयी

नागपूर दि १५ : विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत गिरीश गांधी विजयी झालेले आहेत. गिरीश गांधी यांना 2661 मते मिळाली तर प्रदीप दाते यांना 1187, तर डॉ. श्रीपाद जोशी यांना 701 मते मिळाली. डॉ. रविंद्र शोभणे यांना 205 मते मिळाली तर रंजन दारव्हेकर यांना 114 मते मिळाली. अध्यक्ष पदी निवडून आल्यानंतर गिरीश गांधी यांचे […]Read More

राजकीय

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही […]Read More