Month: November 2024

मनोरंजन

अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात, फोटो व्हायरल

‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली. पवनबरोबर तिचा हा दुसरा विवाह आहे. थाटामाटात पार पडलेल्या लग्नसोहळ्याचे फोटो रेश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना रेश्माने याला “आयुष्याची नवीन सुरुवात” असं कॅप्शन दिलं आहे. अनेक कलाकारांनी रेश्माच्या फोटोवर कमेंट करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा […]Read More

महानगर

भांडुपमध्ये बदलापुरसारखी घटना, लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 मुलींचा विनयभंग

भांडुपमधील एका नामांकित शाळेत पुन्हा एकदा बदलापूरसारखीच घटना समोर आली आहे. लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील तीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना २७ नोव्हेंबरला सकाळी घडली आहे. या शाळेत योगासने शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विद्यार्थिनीनी हा प्रकार घरी सांगितल्याने ही घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी अडचणीत, ऑफिस, घरावर इडीची छापेमारी

चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. नुकतंच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या मुंबईतील घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. पोर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणात ईडीने ही कारवाई करत धाड टाकली आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिल्पा आणि राज कुंद्रा यांचं घर तसेच ऑफीसची झडती घेतली जात […]Read More

राजकीय

आज ठरणार नव्या सरकारचा चेहरा मोहरा, रविवारी शपथविधी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचा सरकार स्थापनेचा मुहूर्त अद्याप अनिश्चित होता मात्र काल मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची रात्री उशिरा बैठक होत असून त्यात राज्य मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा निश्चित करण्यात येईल […]Read More

Lifestyle

हैदराबादचे प्रसिद्ध चिकन 65

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोन लेस चिकन ब्रेस्ट बाइट साइज्ड तुकडे करून. हे मेन. त्याला मॅरिनेट करायला गरम मसाला किंवा भाजलेले धने जिरे पूड एक दीड टी स्पून ,लाल तिखट पूड एक टी स्पून. अर्ध्या लिंबाचा रस व एक टी स्पून मीठ. व नंतर घालायला कॉर्न स्टार्च दोन टे स्पून आणि एक […]Read More

अर्थ

iphone उत्पादनात भारताने केला मोठा विक्रम

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Apple ने iphone उत्पादनात नवा विक्रम केला असून भारतात आयफोनचे उत्पादन 10 अब्ज डॉलर FOB मूल्य पार केले आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यांत हे साध्य झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 37 टक्क्यांनी अधिक आहे. FOB मूल्य म्हणजेच कारखाना सोडण्यापूर्वी हे उत्पादनाचे मूल्य आहे. […]Read More

राजकीय

भारतीय नौदलाकडून K-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

विशाखापट्टणम, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने काल K-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अरिघात या आण्विक पाणबुडीवरून ही चाचणी करण्यात आली. 2017 मध्ये अरिघात लाँच करण्यात आली. त्याची अपग्रेड केलेली आवृत्ती लवकरच कार्यान्वित होईल. अरिघात ही आयएनएस अरिहंतची अपग्रेडेड आवृत्ती आहे. ही विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या जहाज बांधणी केंद्रात (SBC) बांधली गेली. […]Read More

महानगर

शिंदेंनी दाखवला मनाचा मोठेपणा, विरोधकांची कोल्हेकुई थांबली

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुह्रयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांची महायुती टिकून राहावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत काल भूमिका स्पष्ट केली. यातून एक संवेदनशील, भावनाप्रधान लोकांमध्ये जाऊन काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला असे शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे यांच्या भूमिकेने राज्यात […]Read More

सांस्कृतिक

संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत

आळंदी, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा आज संपन्न होत आहे. तर, रविवारी सोहळ्याची सांगता होणार आहे. पहाटे श्रींना पवमान अभिषेक ,दुधारती करण्यात आली. वीणा मंडप, भोजलिंगकाका […]Read More

पर्यावरण

मालवणमध्ये राबवण्यात आली समुद्रतळ स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्ग, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातली पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम असल्याचा दावा करण्यात येत असलेली समुद्रतळ स्वच्छता मोहीम मालवणच्या किनाऱ्यावर राबविण्यात आली आहे.यात सुमारे २५० किलो कचरा बाहेर काढण्यात यश आले आहे, यात वनशक्तीसह इतर संस्थांचा सहभाग होता सागरी परिसंस्थेचे जतन करण्याच्या हेतूने वनशक्ती संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हयात मालवण मध्ये बुधवारी समुद्रतळ स्वच्छता मोहीम […]Read More