iphone उत्पादनात भारताने केला मोठा विक्रम
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Apple ने iphone उत्पादनात नवा विक्रम केला असून भारतात आयफोनचे उत्पादन 10 अब्ज डॉलर FOB मूल्य पार केले आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यांत हे साध्य झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 37 टक्क्यांनी अधिक आहे. FOB मूल्य म्हणजेच कारखाना सोडण्यापूर्वी हे उत्पादनाचे मूल्य आहे. 10 अब्ज डॉलर उत्पादनाचे बाजार मूल्य सुमारे 15 अब्ज डॉलर असू शकते. भारत सरकारने विदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोडक्शन-लिंक इन्सेंटिव्ह (PLI) योजना सुरू केली होती. iphoneच्या उत्पादनात वाढ होण्यामागील हे देखील एक प्रमुख कारण आहे.
भारतासाठी ही अभिमानाची बाब म्हणजे आता ही उत्पादनेही निर्यात होत आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार 7 अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांची निर्यात झाली आहे. हे एकूण उत्पादन किंमतीच्या 70 टक्के आहे. देशांतर्गत बाजारात हे 3 अब्ज डॉलर असल्याचे दिसते. ऑक्टोबर 2024 मध्ये प्रथमच Apple ने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतातील उत्पादनाने 2 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीच्या कामकाजातही नवा विक्रम झाला आहे.
SL/ML/SL
28 Nov. 2024