राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी अडचणीत, ऑफिस, घरावर इडीची छापेमारी
चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. नुकतंच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या मुंबईतील घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. पोर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणात ईडीने ही कारवाई करत धाड टाकली आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिल्पा आणि राज कुंद्रा यांचं घर तसेच ऑफीसची झडती घेतली जात आहे. जून २०२१ मध्ये ‘अश्लील’ चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्रा याला अटक करण्यात आली होती. पोर्नोग्राफी व्हिडिओ संदर्भात राज कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता. दोन महिने कारागृहात राहिल्यानंतर राज कुंद्रा सप्टेंबर २०२१ पासून जामीनावर आहे.