अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात, फोटो व्हायरल
‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली. पवनबरोबर तिचा हा दुसरा विवाह आहे. थाटामाटात पार पडलेल्या लग्नसोहळ्याचे फोटो रेश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना रेश्माने याला “आयुष्याची नवीन सुरुवात” असं कॅप्शन दिलं आहे. अनेक कलाकारांनी रेश्माच्या फोटोवर कमेंट करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.