20 वर्ष पुढे ढकलली 90 वर्षीय तक्रारदार महिलेची सुनावणी …

 20 वर्ष पुढे ढकलली 90 वर्षीय तक्रारदार महिलेची सुनावणी …

मुंबई, दि.२९ : मुंबई हायकोर्टाने 90 वर्षीय महिलेच्या मानहानी प्रकरणातील सुनावणी 20 वर्षे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तक्रारदाराच्या वकिलाने पुनर्विचार मागितल्यानंतर कोर्टाने आदेश बदलला. आता पुढील सुनावणी 15 जुलै 2026 रोजी होणार आहे. 2017 मध्ये दक्षिण मुंबईतील ‘श्याम सहकारी गृहनिर्माण संस्था’च्या सदस्यांविरुद्ध महिलेने व तिच्या मुलीने मानसिक छळ व मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यांनी 20 कोटींची नुकसानभरपाई मागितली होती. 28 एप्रिलला कोर्टाने प्रतिपक्ष माफी मागण्यास तयार असूनही तक्रारदाराने नकार दिल्याने नाराजी व्यक्त केली होती. न्यायमूर्तींनी हे प्रकरण “अहंकाराची लढाई” असल्याचं म्हटलं आणि सुनावणी 2046 पर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश दिला होता.

28 एप्रिलला न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं होतं की, हे प्रकरण अशा प्रकरणांपैकी आहे जिथे आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या दावेदारांचे परस्पर अहंकार न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करत आहेत. परिणामी, न्यायालय अशा इतर प्रकरणांची सुनावणी करू शकत नाही, ज्यांना सुनावणीची अधिक आणि नितांत गरज आहे.

न्यायमूर्तींनी असंही म्हटलं की, हायकोर्टाने आधीच सांगितलं आहे की हा वाद विनशर्त माफीने संपू शकतो. पण 90 वर्षीय तक्रारदार प्रकरण पुढे नेण्यावर अडून बसल्या आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *