‘युनियन बँक ऑफ इंडिया’मध्ये मेगाभरती
मुंबई, दि. २९ : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदाच्या १८६५ रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास आजपासून (२९ एप्रिल २०२६) सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १९ मे २०२६ असणार आहे. तर या भरतीसाठी होणारी परीक्षा २०२६ च्या मे किंवा जून महिन्यात होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाईन पद्धतीने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती यूनियन बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे.
या भरतीमध्ये एकूण १८६५ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त जागा उत्तर प्रदेश (३३५), आंध्र प्रदेश (३०३) आणि महाराष्ट्र (१९६) या राज्यामध्ये आहेत.
अर्जप्रक्रिया सुरू होण्याची तारीख – २९ एप्रिल २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ मे २०२६
परीक्षेची अंदाजित तारीख- मे/जून २०२६
अधिकृत वेबसाईट- https://www.unionbankofindia.bank.in/en/home
अर्जाची लिंक- https://beep.bfsissc.com/candidate_register/mkt
पीडीएफ लिंक- https://www.unionbankofindia.bank.in/pdf/notification-final-1865-april26.pdf
SL/ML/SL