शिवडी येथील झोपड्या तोडल्याबाबत पोलीस स्टेशन समोर झोपडीधारकांनी आंदोलन केले
मुंबई, दि २९
मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) शिवडी पोलीस ठाण्याजवळील सुमारे ५० अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी पथक आले होते. या अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला. “ही जागा आमची आहे,” त्यासाठी रहिवाशांनी विरोध दर्शवून बीएमसीच्या या कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलकांनी आजूबाजूचे रस्ते रोखून धरल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.
स्थानिक रहिवाशांच्या वाढत्या विरोधामुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे प्रशासनाला ही पाडकाम कारवाई तूर्तास थांबवावी लागली.
याठिकाणी कोणताही प्रकारचा कायदा सुरू असलेला धोका निर्माण होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.KK/ML/MS