Month: November 2023

राजकीय

संजय राऊत आणि नाना पटोले वैफल्यग्रस्त

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संजय राऊत, नाना पटोले हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. सकाळी उठल्यावर काहीतरी निराधार शोधायचे आणि पब्लिसिटीत राहायचे अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊला सहकुटुंब होते त्याच हॉटेलमध्ये खाली रेस्टॉरंट आहे. ते कुटुंबासोबत असताना राजकारण करत ट्विट करणे हे अशोभनीय आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपलीही बोटं […]Read More

राजकीय

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडा यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोको

छत्रपती संभाजीनगर, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक आणि नगर येथील धरणातून मराठवाड्यातील धरणात येणारे पाणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित सोडण्यात यावे यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जालना रस्त्यावर असणाऱ्या पाटबंधारे कार्यालयासमोर सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन आज करण्यात आले. यामुळे जालना रोड वरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. https://youtu.be/tU-urvVHFJs ML/KA/SL 20 Nov. 2023Read More

गॅलरी

भंडारा इथे शासन आपल्या दारी

भंडारा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘शासन आपल्या दारी ‘, भंडारा येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे शहापूर हेली पॅडवर आगमन. नागपूर विमानतळावरून विशेष हेलिकॉप्टरने भंडाऱ्याकडे आगमन. भंडारा येथील चैतन्य पोलीस मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. ML/KA/SL 20 Nov. 2023Read More

Lifestyle

हिवाळ्यात गरमागरम मुळा पराठे खा

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यात हिरवी, लाल चटणी आणि दह्यासोबत गरमागरम पराठे खायला मिळाले तर दिवस उजाडतो. होय, या हंगामात तुम्ही अनेक प्रकारचे पराठे तयार करून खाऊ शकता. बटाट्याचे पराठे, फुलकोबीचे पराठे, मिश्र भाजीचे पराठे, वाटाणा पराठे आणि मुळा पराठे देखील. बटाटा आणि कोबीचे पराठे बनवून खाणे बहुतेक लोकांना आवडते, […]Read More

महानगर

संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी लता मंगेशकर संगीत विद्यालय उपयुक्त

ठाणे,, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आपल्या देशाची शान असलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतर ठेवणारे स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमीपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. आमदार प्रताप […]Read More

मनोरंजन

धूम फेम दिग्दर्शकाचे निधन

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): धूम आणि धूम २ या सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक संजय गढवी यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संजय गढवी यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. Dhoom fame director passes away मॉर्निंग वॉकदरम्यान, त्यांना अस्वस्थ वा लागल्यानंतर त्याना […]Read More

देश विदेश

मालदीवचे नवे चिनी समर्थक राष्ट्रपती भारतविरोधी भूमिकेत

माले, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी महासागरात एका बेटावर वसलेल्या चिमुकल्या देशाला आजवर भारताने नैसर्गिक आणि अन्य आपत्तींच्या वेळी सढळ हाताने मदत केली आहे. मात्र आजवर भारताला मित्र म्हणवणाऱ्या मालदीवने आता सत्ता बदलल्यानंतर चीनला प्राधान्य देत भारत विरोधी पावले उचलायला सुरुवात केली आहे. The pro-Chinese president of the Maldives took an anti-India stance […]Read More

पर्यटन

ख्रिसमस , नववर्ष गोव्यात , रेल्वेने केली खास व्यवस्था

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीची सुट्टी संपल्यावर आता हौशी पर्यटक पर्यटकांना नाताळ आणि नववर्षानिमित्त गोव्यात जाण्याचे वेध लागले आहेत. Christmas, New Year in Goa, Railways made special arrangements नाताळ व नववर्ष स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेकडून गोव्याला २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. नाताळ स्पेशल या गाड्या छत्रपती […]Read More

महिला

निकाराग्वाच्या सौंदर्यवतीने जिंकला मिस युनिव्हर्स 2023 किताब

सॅन साल्वाडोर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): मध्य अमेरिकेतील निकाराग्वा या लहानशा देशातील सौंदर्यवतीने यावर्षीचा मिस युनिव्हर्स किताब जिंकला आहे. Beauty of Nicaragua wins Miss Universe 2023 title निकाराग्वाच्या शेन्निस पलासियोसलाने (Sheynnis Palacios) मिस युनिव्हर्स 2023 चा मुकुट पटकावला आहे. तिने हा किताब जिंकल्याचे जाहीर झाल्यावर गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स अमेरिकेची आरबोनी गॅब्रियलने तिला मिस […]Read More

ऍग्रो

ऊस दरासाठी सर्वत्र चक्काजाम आंदोलन

सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या सहा दिवसांपासून ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यात विविध मार्गांनी आंदोलन सुरू आहे. कारखानदार आणि सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने अखेर स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन आणखीन तीव्र करण्यात आले आहे. सांगलीतील सांगली ते पेठ महामार्ग, पुणे बेंगलोर महामार्ग, नांद्रे यांसह अन्य ठिकाणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी […]Read More