ऊस दरासाठी सर्वत्र चक्काजाम आंदोलन

 ऊस दरासाठी सर्वत्र चक्काजाम आंदोलन

सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या सहा दिवसांपासून ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यात विविध मार्गांनी आंदोलन सुरू आहे. कारखानदार आणि सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने अखेर स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन आणखीन तीव्र करण्यात आले आहे. सांगलीतील सांगली ते पेठ महामार्ग, पुणे बेंगलोर महामार्ग, नांद्रे यांसह अन्य ठिकाणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारून रास्तारोको आंदोलन केले. Chakkajam agitation everywhere for sugarcane tariff

यावेळी महामार्गावरून जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नांद्रे गावामध्ये रस्त्यावर टायर देखील पेटवण्यात आल्या आहेत. गत हंगामातील दुसऱ्या हप्त्याचे चारशे रुपये तसेच यंदाच्या हंगामात ३ हजार ५०० रुपये पहिला हप्ता मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून आज सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ML/KA/PGB
19 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *