मालदीवचे नवे चिनी समर्थक राष्ट्रपती भारतविरोधी भूमिकेत

 मालदीवचे नवे चिनी समर्थक राष्ट्रपती भारतविरोधी भूमिकेत

माले, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी महासागरात एका बेटावर वसलेल्या चिमुकल्या देशाला आजवर भारताने नैसर्गिक आणि अन्य आपत्तींच्या वेळी सढळ हाताने मदत केली आहे. मात्र आजवर भारताला मित्र म्हणवणाऱ्या मालदीवने आता सत्ता बदलल्यानंतर चीनला प्राधान्य देत भारत विरोधी पावले उचलायला सुरुवात केली आहे. The pro-Chinese president of the Maldives took an anti-India stance as soon as he came into office

मालदीवचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर 24 तासांच्या आत मोहम्मद मुईज्जू यांनी भारतविरोधी भूमिका घेतली असून त्यांनी भारताला सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने मालदीवमधून आपलं लष्कर मागे घ्यावं.

मुईझू यांनी शुक्रवारी (17 नोव्हेंबर) शपथ घेतल्यानंतर म्हटले की, मालदीवच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी देशात कोणतेही परदेशी सैन्य अस्तित्वात नाही याची खात्री करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. चीन समर्थक समजले जाणारे मुईझू हे मालदीवचे आठवे राष्ट्राध्यक्ष आहेत.

मालदीवमध्ये चीन आता मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असून मालदीवही त्यांना त्यासाठी मोठी संधी देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

SL/ KA/ SL
19 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *