धूम फेम दिग्दर्शकाचे निधन

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): धूम आणि धूम २ या सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक संजय गढवी यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संजय गढवी यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. Dhoom fame director passes away
मॉर्निंग वॉकदरम्यान, त्यांना अस्वस्थ वा लागल्यानंतर त्याना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.
संजय यांनी यशराज फिल्म्ससोबत जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि ऋतिक रोशन स्टारर ‘धूम’ आणि ‘धूम २’ चं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमांनी त्यांना यशाचं शिखर दाखवलं
आता त्यांनी २०२०मध्ये ‘ऑपरेशन परिंदे’ सिनेमांमधून ओटीटीवर पदार्पण केलं होतं.
किडनॅप,अजब गजब लव असे काही सिनेमे संजय यांनी दिग्दर्शित केले होते.
संजय यांच्या निधनावर अनेक बॉलिवूड कलाकारां शोक व्यक्त केला आहे.
SL/ KA/ SL
19 Nov. 2023