Month: June 2023

महानगर

डोंगरीतून 50 कोटींचे अंमलीपदार्थ जप्त

मुंबई दि.10( एम एमसी न्यूज नेटवर्क) : एनसीबीने डोंगरी परिसरात केलेल्या कारवाईत 20 किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. याप्रकरणी महिला तस्करासह तिघांना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत 50 कोटी रुपये असून, या छाप्यात एक कोटी 10 लाख रुपयांची रोख रक्कम व 186 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. डोंगरी परिसरात मेफेड्रोनचे वितरण […]Read More

देश विदेश

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया कार्याध्यक्ष, पवारांची घोषणा

दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी अपेक्षेनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या खास मर्जीतील नेत्यांची नियुक्ती अध्यक्ष शरद पवार यांनी आज जाहीर केली असून अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. आज नवी दिल्ली इथे पक्षाच्या स्थापना केली दिनाच्या निमित्ताने शरद पवार यांनी ही घोषणा केली आणि पटेल, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांची मांदियाळी

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे आज शनिवारी (१० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखीचे उद्या रविवारी (११ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. भाविक मोठ्या संख्येने देहूत दाखल झाले आहेत. देवस्थानकडून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३८ वे वर्ष आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या […]Read More

सांस्कृतिक

श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले. गणपती बाप्पा मोरया… माऊली माऊली च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत निर्मल वारी – हरित वारी […]Read More

ट्रेण्डिंग

दंगलीचे लोण आता खान्देशात ही पसरले…

जळगाव, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात अनेक भागात सध्या दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अमळनेर शहरात काल रात्री दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, शहरात समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे तेढ निर्माण होऊन दोन समाजातील लोक आपसात भिडले. दुकानाची तोडफोड तर अनेक घरांवर दगडफेक झाली आहे. त्यामुळे कलम १४४ अन्वये शहरात संचारबंदी लागू करण्यात […]Read More

राजकीय

पवार, राउतना जीवे मारण्याची धमकी

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खा संजय राऊत यांना ठार मारण्याच्या धमक्या ट्विटर वर देण्यात आल्याच्या घटना घडल्या असून अशा घटना गांभीर्याने घेतल्या जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज सकाळी आपल्या वॉट्स ॲपवर शरद पवार यांना धमकी देणारे ट्विट पाठवण्यात आले अशी माहिती खा सुप्रिया […]Read More

सांस्कृतिक

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ….

सोलापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या आषाढी एकादशी दिवशी यंदा व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांना अधिक दर्शनाचा लाभ मिळेल. तसेच यंदा भाविकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यासाठी प्रशासान सज्ज आहे. दर्शन रांगेसह पालखी मार्गावरही सुविधा देण्यात येतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यावेळी वारकरी […]Read More

ट्रेण्डिंग

लाचखोर IAS अधिकाऱ्याच्या घरातील पैसे मोजण्यासाठी आणावे लागले मशिन

पुणे, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोटा मोजण्याचे मशिन तुम्ही फक्त बँकेमध्ये किंवा चित्रपटांमध्येच पाहीले असेल. मात्र पुणे येथे CBI ने IAS अधिकाऱ्याविरुद्ध केलेल्या कारवाईत त्यांच्या घरातील रक्कम मोजण्यासाठी चक्क मशिन मागवावे लागले आहे. पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड (IAS) सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने त्यांना रंगेहाथ […]Read More

करिअर

UPSSSC 382 एक्स-रे तंत्रज्ञ पदांसाठी भरती

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने एक्स-रे टेक्निशियनच्या ३८२ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. तथापि, या रिक्त पदासाठी नोंदणी 15 जून 2023 पासून सुरू होईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जुलै 2023 आहे. UPSSAC च्या या पदांसाठी अर्ज करण्याची आणि ऑनलाइन फी जमा करण्याची अंतिम तारीख 5 जुलै […]Read More

पर्यटन

संस्मरणीय रोड ट्रिप…मुंबईपासून कन्याकुमारी

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्ही पर्वत आणि समुद्र यापैकी कधीही निवडू शकत नसाल, तर पश्चिम किनार्‍यावरील संस्मरणीय रोड ट्रिपसाठी आम्ही तुम्हाला कव्हर केले आहे. मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व मार्गाने धावणारा राष्ट्रीय महामार्ग 66 तुम्हाला अरबी समुद्राच्या किनार्‍यावर तसेच हिरव्यागार पश्चिम घाटातून घेऊन जाईल. अलिबाग, लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वर आणि लवासा यांसारख्या अनेक ठिकाणी तुम्ही वळसा […]Read More