पवार, राउतना जीवे मारण्याची धमकी

 पवार, राउतना जीवे मारण्याची धमकी

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खा संजय राऊत यांना ठार मारण्याच्या धमक्या ट्विटर वर देण्यात आल्याच्या घटना घडल्या असून अशा घटना गांभीर्याने घेतल्या जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आज सकाळी आपल्या वॉट्स ॲपवर शरद पवार यांना धमकी देणारे ट्विट पाठवण्यात आले अशी माहिती खा सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली . यानंतर त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत यावर कडक आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

याचवेळी खा संजय राऊत यांनी देखील आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असून त्याबाबत रीतसर तक्रार केली आहे असे सांगितले मात्र सरकार याकडे केवळ चेष्टा म्हणून बघणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही नेत्याबाबत असे प्रकार खपवून घेणार नाही, आम्ही राजकीय विरोधक आहोत , मात्र वैयक्तिक पातळीवर आमचे संबंध चांगलेच आहेत , त्यामुळे पोलिस या दोन्ही प्रकरणात गांभीर्याने कारवाई करतील असे फडणवीस म्हणाले.

ML/KA/PGB
9 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *