दंगलीचे लोण आता खान्देशात ही पसरले…

जळगाव, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात अनेक भागात सध्या दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अमळनेर शहरात काल रात्री दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, शहरात समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे तेढ निर्माण होऊन दोन समाजातील लोक आपसात भिडले.
दुकानाची तोडफोड तर अनेक घरांवर दगडफेक झाली आहे. त्यामुळे कलम १४४ अन्वये शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ९ तारखेच्या रात्री १० वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात आज सकाळी ११ पासून ते १२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणेत आली आहे.
अहमदनगर ,कोल्हापूर , बीड जिल्ह्यातील आष्टी पाठोपाठ आता दंगलीचे लोण आता खान्देशात ही पसरले असल्याचे दिसले आहे.
ML/KA/SL
10 June 2023