आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ….

 आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ….

सोलापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या आषाढी एकादशी दिवशी यंदा व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांना अधिक दर्शनाचा लाभ मिळेल. तसेच यंदा भाविकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यासाठी प्रशासान सज्ज आहे. दर्शन रांगेसह पालखी मार्गावरही सुविधा देण्यात येतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

यावेळी वारकरी संघटनांच्या वतीने विखे पाटील यांच्याकडे वारकरी दिंड्यांना 50 हजार रुपये प्रमाणे नव्याने शासकीय अनुदान सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात मोठ्या संख्येने आमदार खासदार अधिकारी ठेकेदार हे व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली मंदिरात गर्दी करत असतात. अशा सर्वांनाच यंदा महसूल मंत्री विखे पाटील यांच्या निर्णयामुळे चाप बसणार आहे.परिणामी भाविकांना बिनादिक्कत थेट दर्शनाचा लाभ होईल. त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद करण्याच्या निर्णयाचे सध्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह पंढरपूर मधील आषाढी वारीचा आढावा घेत विविध ठिकाणची पाहणी केली. तसेच पालखी वर्गाची देखील पाहणी केली.

विविध ठिकाणी वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत माहिती घेऊन नव्याने भाविकांना चांगल्या सुविधा देण्याच्या सूचना यावेळी मंत्र्यांनी केल्या. VIP darshan closed in Ashadhi Wari

वाळू प्रमाणे खडी धोरणही

राज्यामध्ये महसूल विभागाने वाळूचे धोरण ठरवले त्याचप्रमाणे आता खडीसाठी सुद्धा लवकरच एक नवे धोरण ठरवले जाईल. वाळूचा काळाबाजार थांबवण्यासाठी सॅनड क्रश वापरण्याची गरज असल्याचे मतही यावेळी महसूल मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.

ML/KA/PGB
9 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *