Month: March 2023

कोकण

मुंबई गोवा महामार्ग रखडल्याबद्दल गडकरींची दिलगिरी

पनवेल, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : असंख्य अडचणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत रखडलेला मुंबई गोवा महामार्ग येत्या वर्षीच्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज रायगड जिल्ह्यातील खारपाडा इथे दिली आणि हा महामार्ग रखडल्याबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली. या महामार्गाच्या पळस्पे ते कासु दरम्यानच्या काँक्रीटीकरण शुभारंभ […]Read More

करिअर

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी गिरवतायत जर्मन भाषेचे धडे

बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हा परिषद शाळा आता उपक्रमशील शाळा म्हणून पुढे येत आहेत. विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत अव्वल ठरत आहेत. अशाच बीड जिल्ह्यातीलउमरद खालसा या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी चक्क जर्मन भाषेचे धडे गिरवत आहेत. इथले विद्यार्थी अगदी पोपटासारखी जर्मन भाषा बोलत आहेत. त्यामुळं ही शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे. […]Read More

विदर्भ

सव्वा किलो चांदीतून साकारली राममंदिराची प्रतिकृती

वर्धा, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रामजन्म निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील विविध राममंदिरात सकाळ पासून भक्तिभावाने राम भक्त दर्शन घेत आहेत. अयोध्येला भव्य राममंदिराचे निर्माण होत आहे. त्याच अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात सव्वा किलो चांदीतून अयोध्या येथील निर्माणाधिन राममंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. वर्धेतील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्सने दिल्लीहून ही प्रतिकृती तयार केली. श्रीराम नवमीनिमित्त […]Read More

सांस्कृतिक

कोट्यावधी हिंदूंचे आदर्श श्रीराम

भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात मर्यादा पुरुषोत्तम अशी ओळख असलेल्या आणि श्री विष्णूचा सातवा अवतार म्हणून भगवान श्रीरामाच्या जन्मा प्रित्यर्थ श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात भारतभर साजरा केला जातो. कौटुंबिक जीवनात एखाद्या व्यक्तीने कसे आदर्श जीवन जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण आणि आदर्श म्हणून भारतीय समाजात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची मनोभावे पूजा केली जाते. भगवान श्रीरामाचे जीवन हे […]Read More

ऍग्रो

कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज मुदत

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी ३ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत अर्ज करावे असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ […]Read More

मराठवाडा

श्री राम मंदिर परिसरात दगडफेक केल्यानंतर जाळपोळ , तोडफोड

छ. संभाजी नगर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजी नगर शहरातील किराडपुरा भागात चार ते पाच नशेखोरांनी परिसरातील असलेल्या राम मंदिराच्या परिसरात दगडफेक केली असून या पार्श्वभूमीवरराम मंदिर जळाल्याची काही समाजकंटकांकडून जळाल्याची अफवा पसरवण्यात आल्याने या शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात काही तरुणांकडून गाड्यांची तोडफोड व जाळपोळ व तोडफोड करण्यात […]Read More

महानगर

मुंबईकरांना मिळणार ‘डिजीलॉकर’ विवाह नोंदणी प्रमाणपत्र

मुंबई , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणखी एक ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली असून केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम असलेल्या ‘डिजीलॉकर’ या ऑनलाईन शासकीय व अधिकृत कागदपत्रांच्या ऍपमध्ये आता मुंबईकर नागरिकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन जतन करता येईल. महापालिकेकडे २८ जानेवारी २०१६ नंतर विवाह नोंदणी केलेल्यांना […]Read More

ट्रेण्डिंग

निवडणूक आयोग या घटकांना देणार घरबसल्या मतदानाची सुविधा

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील निवडणूक प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना विनासायास सहभागी होता यावे यासाठी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. निवडणूक आयोगाने आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे.यावेळी कर्नाटक निवडणुकीत आयोग घरबसल्या […]Read More

महानगर

अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणात कारवाई करत एनसीबीने पाच जणांना अटक केल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने दिली आहे.अंकिल जगदीशचंद्र खोलवडवाला (वय 38 ), जगदीशचंद्र भोगीलाल खोलवडवाला (वय 67), गिरधर शिवराम चातुरी(वय 37), फकरुद्दीन मोमीन(40) आणि इम्रान अस्लम देवकर […]Read More