अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त

 अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणात कारवाई करत एनसीबीने पाच जणांना अटक केल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने दिली आहे.
अंकिल जगदीशचंद्र खोलवडवाला (वय 38 ), जगदीशचंद्र भोगीलाल खोलवडवाला (वय 67), गिरधर शिवराम चातुरी(वय 37), फकरुद्दीन मोमीन(40) आणि इम्रान अस्लम देवकर (42)अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे आहेत.
हे रॅकेट डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन विक्री केल्या जाणाऱ्या औषधांच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे विक्री करणे आणि त्याचा अंमली पदार्सांठी वापर करण्यात गुंतले होते. एनसीबीने या कारवाईत 3,195 सीबीसीएस (CBCS )बाटल्या जप्त केल्या. त्यांच्याकडून काही वाहने आणि इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.Tribute to the Chief Minister

एनसीबीला मुंबई, ठाणे आणि लगतच्या भागात इतर प्रिस्क्रिप्शन ड्रग्ससह CBCS बाटल्यांची सक्रिय बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन एनसीबीने चौकशी सुरु केली. सापळा रचून शोध घेतला. या चौकशीत भिवंडी येथील इम्रान अस्लम देवकर नावाच्या व्यक्तीची ओळख पटली. जो अशा प्रकारच्या ड्रग्ज विक्रीत सहभागी होता. एनसीबीने हळूहळू, त्याच्या ठिकाणांबद्दल आणि त्याच्या कार्यपद्धतीबद्दल गुप्त माहिती गोळा केली गेली. दरम्यान, अधीक माहिती मिळाली की, सुरत येथील अंकिल जगदीशचंद्र खोलवडवाला नावाचा व्यक्ती इम्रान एडीला (इम्रान अस्लम देवकर) माल पुरवत होता. एनसीबीने या व्यक्तींवर पाळत ठेवली. ज्यामुळे नेकवर्कमध्ये सहभागी असलेल्या अनेकांची ओळख पटली.
अंकिल जेके आणि इम्रान एडी हे दोघेही गेल्या 4-5 वर्षांपासून या व्यवसायात सक्रिय आहे. अंकिल जेके हे एमडी-फिजिशियन आहेत . त्यांची सुरतमध्ये वैद्यकीय सुविधा आहे.तसेच उत्तर भारतातील उत्पादन युनिट्समधून अशा औषधांच्या खरेदीसाठी एक फर्म स्थापन केली आहे. इम्रान एडी यापूर्वी मुंबई आणि आजूबाजूच्या भागात रस्त्यावरील पेडलिंगमध्ये सामील होता. तो अंकिल जेकेच्या संपर्कात आला. ज्याने त्याला रिसीव्हर कम वितरक म्हणून काम करण्यास प्रवृत्त केले,असे एनसीबी मुंबईचे
विभागीय संचालक अमित घावटे यांनी म्हटलं आहे.

ML/KA/PGB
29 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *