निवडणूक आयोग या घटकांना देणार घरबसल्या मतदानाची सुविधा

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील निवडणूक प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना विनासायास सहभागी होता यावे यासाठी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. निवडणूक आयोगाने आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे.यावेळी कर्नाटक निवडणुकीत आयोग घरबसल्या मतदानाची नवी सुविधा देणार आहे.
यावेळी कर्नाटक निवडणुकीत निवडणूक आयोग वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी एक नवीन आणि विशेष सुविधा देणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत घरबसल्या मतदानाची सुविधा 80 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध असेल.
सीईसी राजीव कुमार म्हणाले, ‘आमची टीम फॉर्म-12 डी घेऊन अशा मतदारांकडे जाईल. याबाबत गुप्तता पाळण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी ‘सक्षम’ हे मोबाईल अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये ते लॉग इन करून मतदान करण्याची सुविधा निवडू शकतात, असे त्यांनी सांगितले.
SL/KA/SL
29 March 2023