श्री राम मंदिर परिसरात दगडफेक केल्यानंतर जाळपोळ , तोडफोड

छ. संभाजी नगर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजी नगर शहरातील किराडपुरा भागात चार ते पाच नशेखोरांनी परिसरातील असलेल्या राम मंदिराच्या परिसरात दगडफेक केली असून या पार्श्वभूमीवर
राम मंदिर जळाल्याची काही समाजकंटकांकडून जळाल्याची अफवा पसरवण्यात आल्याने या शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या परिसरात काही तरुणांकडून गाड्यांची तोडफोड व जाळपोळ व तोडफोड करण्यात आली आहे. मात्र मंदिरात कोणतीही हानी नाही, आता शांतता राखावी असे आवाहन केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड, मंत्री अतुल सावे, खा. इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जयस्वाल आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले आहे.
मंदिरा बाहेर काही समाजकंटकांनी दगडफेक केली आणि काही वाहनेही जाळली परंतु मंदिराच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही असे या सर्वांनी सांगितले.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली.
पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या.
शहराच्या किऱ्हाडपुरातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री बारा वाजेच्या सुमारास काही कारणावरून दोन गटांत वाद झाला. मात्र सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
ML/KA/SL
30 March 2023