mmcnews mmcnews

करिअर

बिहार विधानसभेत सुरक्षा रक्षकाच्या 69 पदांवर भरती

बिहार, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बिहार विधानसभेत सुरक्षा रक्षक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 69 पदांवर भरती होणार आहे. या रिक्त पदासाठी, vidhansabha.bih.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. विशेष तारखा अर्ज सुरू करण्याची तारीख: 25 एप्रिल 2023अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2023परीक्षेची तारीख: अजून ठरलेली नाहीअर्ज […]Read More

राजकीय

येत्या पाच वर्षात महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त

नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन विभाग राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल. केंद्रीय रस्ते निधी सी आर एफ मधून सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या तरतुदीने महाराष्ट्रामध्ये रोड ओवर ब्रिजची योजना राबवली जाईल. सध्या राज्यामध्ये 1,200 कोटी रुपयांच्या तरतुदीने 25 आरओबी बांधले जातील अशी […]Read More

ट्रेण्डिंग

मद्य विक्री धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांची होणार चौकशी

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. अरविंद केजरीवाल यांची १६ एप्रिलला चौकशी केली जाणार आहे. सीबीआय […]Read More

ट्रेण्डिंग

बस खोल दरीत कोसळली, सात मृत्यू , २९ प्रवासी जखमी

खोपोली, दि. १५ : रायगड जिल्ह्यातील जुना मुंबई – पुणे मार्गावर खोपोली येथे भीषण अपघात झाला असून त्यातजुना पुणे मुंबई हायवे, शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दरीमध्ये कोसळलेली आहे. यामध्ये ४५ प्रवाशी असून, यातील १३ प्रवासी मयत झाल्याचे आणि २९ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर दरीमध्ये उतरून बचाव कार्याला सुरुवात […]Read More

ट्रेण्डिंग

अखेर राहुल गांधी यांनी सरकारी बंगला सोडला

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासदार म्हणून अपात्र ठरलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचा सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले होते. आता राहुल गांधी यांचे अधिकृत निवासस्थान खाली करताना दिसत आहेत. आता ते त्यांची आई सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी जात आहेत.सरकारी निवासस्थान रिकामे करण्यासाठी त्यांना 22 एप्रिल ही […]Read More

देश विदेश

गौतम नवलाखा हा दहशतवादी गटाचा सक्रिय सदस्य

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असून त्यांची शस्त्रास्त्र प्रशिक्षणालाही उपस्थिती असल्याचं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले विचारवंत गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे पुरावे आहेत. असं निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून […]Read More

अर्थ

पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर GST ची कारवाई

बीड, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या बीडमधील परळीतील वैजनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. जीएसटीचा छापा, ‘वरच्याकडून आदेश’ आल्याने झाल्याचा आरोप करत पंकजा मुंडे यांनी “महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील साखर कारखाना गेली अनेक वर्षे तोट्यात चालला होता आणि तो चालू नव्हता. ‘कोणताही कर चुकवण्याचा कोणताही हेतू नव्हता”, असा […]Read More

ऍग्रो

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्र्यांच्या हस्ते मिलेट्स फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या २०२३ या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षांनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 2023 या वर्षासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या भारताच्या अध्यक्षपदा अंतर्गत, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने, मुंबईत ताजमहाल पॅलेस हॉटेल इथे 13 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत “SCO […]Read More

महानगर

ठाकरेंचा सध्या दार खटखटवण्याचा कार्यक्रम सुरू

मुंबई , दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जेव्हा उध्दव ठाकरे , आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हिंदुत्ववादी होते तेव्हा, दार उघड बये दार.. हे जगदंबे चरणी गाणे म्हणत होते. मात्र जेव्हा पासून त्यांनी हिंदुत्व सोडले त्या दिवसापासून ते दार खटखटाव भाई दार खटखटाव असा कार्यक्रम करीत आहेत. कधी ते तेजस्वी यादव, कधी केजरीवाल, कधी टिआरएस अशाच […]Read More

महानगर

आली शासकीय योजनांची जत्रा, मिळणार विविध योजनांचे लाभ

मुंबई , दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५ जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे […]Read More