mmcnews mmcnews

करिअर

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगतर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर 110 कॉपीराइट नोंदणी

पुणे, दि १८: कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगने एक ऐतिहासिक कामगिरी बजावत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या क्षेत्रात तब्बल ११० कॉपीराइट्स नोंदवले आहेत. या कॉपीराइटेड कामांमध्ये संशोधन लेख, एआय-आधारित सॉफ्टवेअर कोड्स, विषयवार प्रेझेंटेशन स्लाईड्स, शैक्षणिक व्हिडिओज, पोस्टर्स, कविता आणि एआयवरील ब्लॉग्ज यांचा समावेश आहे. या सर्व कार्याचे एकत्रित संकलन असलेली विशेष पुस्तिका स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने […]Read More

कोकण

रायगडमध्ये तुफानी पाऊस,तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी….

अलिबाग दि १८ — रायगड जिल्ह्यात चार दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाने अजून उसंत घेतलेली नाही. कधी जोरदार कधी जेमतेम मात्र, पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे उतरंडीला लागलेल्या नद्या पुन्हा भरून गेल्या आहे. जिल्ह्यातील तीन नद्यांनी सोमवार (१८ ऑगस्ट) दुपारी ३ वाजेपर्यंत धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचा […]Read More

विदर्भ

चंद्रपुरात मुसळधार पाऊस,वर्धा नदी फुगल्याने अनेक मार्ग बंद…

चंद्रपूर दि १८:- चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील तीन चार दिवसांपासून अधेमधे पडणारा पाऊस आज सलग येऊ लागल्याने चंद्रपूर शहरातील नागरिकांची त्रेधा उडाली. सखल भागात पाणी साचू लागले असून, रस्त्यांवरही पावसाचे पाणी आले आहे. दुसरीकडे, वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपुरातून कोरपनाकडे जाणारा भोयेगाव मार्ग आणि बल्लारपूर राजुरा मार्ग बंद झाला. त्यामुळे तेलंगणाची […]Read More

मराठवाडा

परभणी मध्ये पूर परिस्थिती, नदी नाले तुडुंब….

परभणी दि १८ — जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून आज जिल्ह्यातील बारा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे तर अनेक भागांमध्ये पाणी साचले असूनओढे नदी नाले यांना पूर आले आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले असून पूर्णा नदीत विसर्ग २१ हजार क्युसेक्सने सुरू आहे तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर […]Read More

मराठवाडा

लेंडी नदीला पूर – रस्ते, घरे, शेती पाण्याखाली!

लातूर दि १८– लातूर, नांदेड आणि कर्नाटक सीमारेषेवर वसलेलं धडकनाळ गाव सध्या प्रचंड पाण्याच्या विळख्यात आलं आहे. लेंडी नदीच्या पुरामुळे गाव पूर्णपणे जलमय झालं असून वाहतुकीसह नागरिकांचं दैनंदिन जीवन ठप्प झालं आहे. उदगीर–मुक्रमाबाद–देगलूर मुख्य रस्ता धडकनाळजवळ पूर्णपणे बंद पडला आहे. कर्नाटक व सीमाभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला आलेल्या तुफान पुरामुळे बोरगाव आणि धडकनाळ गावत […]Read More

महानगर

सी पी राधाकृष्णन यांचे दिल्लीला प्रयाण…

मुंबई दि १८– भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन आले व विमानतळावर मुख्यमंत्र्यांसोबत सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्रांचे […]Read More

कोकण

जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी…

रत्नागिरी दि १८:– खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती गंभीर होत चालली आहे. आज सकाळी ९.३० वाजेपर्यंत जगबुडी नदीवरील भरणे नाका पुलाजवळ पाणीपातळी ७.४० मीटर इतकी नोंदवली गेली असून, ही पातळी धोक्याच्या ७ मीटर रेषेपेक्षा वर गेली आहे. पाण्याची वाढ अजूनही सुरूच आहे.खेड नगरपरिषदेने नागरिक आणि व्यापारी बांधवांना तातडीचा इशारा दिला आहे. सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह सुरक्षित […]Read More

मराठवाडा

सोमठाणा धरणात पाण्याची मोठी आवक, आतापर्यंत 72.66 टक्के भरले…

जालना दि १८ :– मुसळधार पावसामुळे जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सध्या धरण 72.66 टक्के भरले असून, ओव्हरफ्लो होण्यासाठी केवळ दोन फूट बाकी आहे. बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील नदी, नाले, ओढे आणि साठवण तलावांमध्ये पाण्याचा मोठा […]Read More

मराठवाडा

मुसळधार पावसामुळे पाच वर्षांनंतर प्रथमच कुंडलिका नदीला पूर…..

जालना दि १८:– मुसळधार पावसामुळे जालन्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर आला आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच या नदीला पूर आला असून नदी ओसंडून वाहत आहे. मागील 3 ते 4 दिवसांपासून जालना जिल्हाभरात मुसळधार जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नदी, नाले ओसंडून वाहू लागलेत. जालन्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीलाही मुसळधार पावसामुळे पूर आला असून पाच […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट; राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

कोल्हापूर दि १८– शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित उघडले आहेत. दरम्यान, हवामान विभागाकडून आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरण […]Read More