mmcnews mmcnews

राजकीय

माजी आमदार दिलीप वाघ यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

मुंबई, दि. 28पाचोरा – भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ. […]Read More

विदर्भ

विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सावरकर यांना अभिवादन

नागपूर दि २८– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील शंकर नगर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर महानगर पालिका, स्वातंत्रवीर सावरकर स्मारक समिती, कठाळे परिवार प्रतिष्ठान, चित्पावन ब्राह्मण संघ नागपूर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूर, हिंदू महासभा तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली दर्शनासाठी खुली

पुणे दि २८– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील खोली आज त्यांच्या जयंती निमित्त सर्वांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृहात शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीकडून गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी डेक्कन एज्युकेशन […]Read More

देश विदेश

पहलगाम हल्ल्यातील 26 मृतांचे होणार स्मारक

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काल पहलगाम येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहलगाम हल्ल्यातील 26 मृतांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला. बायसारन मीडोज येथे हे स्मारक उभारले जाणार आहे, या ठिकाणी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ जणांची अमानुष हत्या केली होती. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, हे स्मारक केवळ श्रद्धांजलीच नव्हे, तर […]Read More

ट्रेण्डिंग

CBDT ने वाढवली आयकर रिटर्न भरण्याची मुदत

नवी दिल्ली | २७ मे २०२५ – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) ने २०२५-२६ या आकलन वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ वरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. CBDT चा निर्णय आणि त्यामागील कारणेCBDT ने स्पष्ट केले की यंदा ITR फॉर्ममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत, तसेच फाइलिंग प्रणालीमध्ये सुधारणा […]Read More

देश विदेश

लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 27 मे 2025 — भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या सिव्हिल इन्व्हेस्टिचर समारंभात पद्म पुरस्कार प्रदान केले. या समारंभात 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. […]Read More

आरोग्य

निरामय आरोग्यासाठी एकवटला देश – योग संगमासाठी १० हजार संस्थांनी

नवी दिल्ली,दि. २७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात”च्या १२२व्या भागात भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात योगाचा वाढता समावेश कौतुकास्पद असल्याचे सांगितले. या आवाहनानंतर १०,००० हून अधिक संस्थांनी “योगा संगम” साठी नोंदणी केली आहे, आणि हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा समुदाय-आधारित आरोग्य उपक्रम ठरणार आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात स्पष्ट केले की, […]Read More

राजकीय

रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीस नकार

मुंबई, दि २७ — गेटवे ऑफ इंडियाजवळ उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल सुविधांच्या प्रकल्पावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला आहे. सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, “शहरात काहीतरी चांगले घडते आहे,” हे लक्षात घेता प्रकल्पाला रोखणे उचित ठरणार नाही. या प्रकल्पासंबंधी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने […]Read More

राजकीय

शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ

मुंबई दि २७– शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 85 नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटप पत्रास मुद्रांक […]Read More

ट्रेण्डिंग

प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना या मार्गांवर कर सवलत

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ अंतर्गत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावाशेवा अटलसेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल राबवले जाईल. याअंतर्गत २०३० पर्यंत राज्यातील वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन […]Read More