mmcnews mmcnews

देश विदेश

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अंतराळातून धक्कादायक माहिती

मागील जून महिन्यापासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अडकल्या आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत, त्यांचे वजन कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी अंतराळातून स्वतचा फोटो पाठवला आहे. त्यातून त्यांच्या प्रकृतीचा अंदाज येतो. या फोटोत सुनीता अंत्यत सडपातळ झालेली दिसत आहे. मात्र, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने अफवांना लगाम बसला आहे.सुनीता विल्यम्स […]Read More

ट्रेण्डिंग

दि. २० नोव्हेंबर, २०२४ राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के

मुंबई, दि.२० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:अहमदनगर – ३२.९० टक्के,अकोला – २९.८७ टक्के,अमरावती – ३१.३२ टक्के, औरंगाबाद- ३३.८९ टक्के, बीड – ३२.५८ टक्के, भंडारा- ३५.०६ टक्के, बुलढाणा- ३२.९१ […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकुटुंब मतदान

ठाणे, दि. 20(एमएमसी न्यूज नेटवर्क) :ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील उमेदवार असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज किसननगर इथे सहकुटुंब मतदान केले. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी निघण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी ओवाळून शुभेच्छा दिल्या.Read More

पर्यटन

ब्रिटीशकालीन मालमत्ता, फोर्ट रायचक

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलकाता जवळ एक दिवसाच्या सहलीचे नियोजन करत असताना, पर्यटक यादीत फोर्ट रायचक जोडणे चुकवू शकत नाहीत. आता एक रिसॉर्ट, फोर्ट रायचक ही ब्रिटीशकालीन मालमत्ता आहे जी एक अद्वितीय आकर्षण आहे. इंग्लिश क्लबहाऊस, नदीचे दृश्य असलेल्या खोल्या, टेनिस कोर्ट, एक आलिशान स्पा, हिरवीगार हिरवळ आणि खाजगी पूल एकत्रितपणे या […]Read More

महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी उद्या मतदान

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी आता थंडावली असून आता उमेदवार आणि मतदार यांना उद्याच्या दिवसाचे वेध लागले आहेत. उद्या (दि. २०) राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. राज्यभरात एकूण १००१८६ मतदान केंद्रे, २४१ सहाय्यक मतदान केंद्रे, ९९० क्रिटीकल मतदान केंद्रे उभारण्यात आली असून […]Read More

मराठवाडा

प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन

पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून आपल्या गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन झालं आहे. गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी मुकुंद यांच्या निधनाची माहिती दिली आहे. मित्राच्या जाण्याने सलील यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सलील कुलकर्णी यांनी मुकुंद यांच्या निधनाची माहिती देत सोशल मीडियावर पोस्ट […]Read More

अर्थ

Competition Commission of India कडून Meta ला २१३.१४ कोटींचा दंड

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्हॉट्सॲपने नव्याने स्वीकारलेल्या गोपनीयता धोरणाच्या संदर्भात अनुचित व्यावसायिक प्रथांचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत, भारतीय स्पर्धा आयोगाने (Competition Commission of India) काल व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या मेटाला २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. Competition Commission of India ने मेटाला बाजार वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला, असे आदेशात […]Read More

देश विदेश

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिली अण्वस्त्र वापरास परवानगी

मॉस्को, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बने केलेल्या विध्वंसानंतरही जगभरातील देशांनी अण्वस्त्र बनवणे थांबवलेले नाही. भारतासह जगातिक बहुसंख्य विकसनशील आणि विकसित देशांनी स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्रांची निर्मिती सुरुच ठेवली आहे. मात्र अद्याप त्याच्या वापरास कोणी धजावलेले नाही. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अण्वस्त्र वापराच्या निर्णयाला परवानगी […]Read More

पर्यावरण

गंगास्नान धोकादायक, हरित लवादाने दिला इशारा

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी परंपरेचा अविभाज्य भाग असलेली गंगा नदी आता अतिरेकी मानवी हस्तक्षेपामुळे धोकादायक पातळीपर्यंत प्रदुषित झाली आहे. त्यामुळे अतिशय पवित्र मानले गेलेले गंगास्नानही आता धोकादायक झाले आहे. राष्ट्रीय हरित लवादानेच हा धोक्याचा इशारा दिला असून गंगेच्या काठावर सर्वसामान्य लोकांसाठी धोक्याचा इशारा देणारे फलक […]Read More

देश विदेश

भारताचं नवं सॅटेलाईट लॉंच, इलॉन मस्क यांच्या SpaceX चे सहाय्य

भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले आहे. ISRO चे हे सॅटेलाईट (उपग्रहाच्या) उद्योगपती इलॉन मस्कच्या SpaceX यांच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याचे कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बळकट होईल, असे सांगितले जात आहे. 4700 किलोग्रॅम वजनाच्या GSAT-N2 […]Read More