mmcnews mmcnews

राजकीय

आदिवासी आश्रमशाळांसाठी आता सेंट्रल किचन

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांसाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर ( सेंट्रल किचन) सुरू करण्याचा विचार आहे, असं आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांसाठी अन्नधान्य खरेदीच्या निविदा प्रक्रिया प्रलंबित असल्याबाबत भाजपाचे रमेशदादा पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. या […]Read More

महानगर

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; विरोधकांच्या घोषणा

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.Budget is the pumpkin of illusion; Opposition Declarations अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा […]Read More

क्रीडा

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आता अभिमत क्रीडा विद्यापीठ

अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय पारंपरिक खेळ व क्रीडा च्या माध्यमातून समाजाला बलवान करण्याकरिता अंबादास पंत वैद्य यांनी 1914 मध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली. विश्व बलधर्म विद्यापीठ स्थापनेचे ध्येय अविरत जोपासले. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनामध्ये आज श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावतीकरांना मोठी उपलब्धी प्राप्त झाली आहे. राज्याचे […]Read More

ट्रेण्डिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसह घेतला क्रिकेटचा आनंद

नवी दिल्‍ली, 9 मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमधील अहमदाबादच्या नरेन्द्र मोदी मैदानावर सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषकाच्या चौथ्या कसोटी सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आज उपस्थित होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “क्रिकेटची आवड हा भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातला समान धागा आहे! भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या काही क्षणांचे […]Read More

महिला

स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची जबाबदारी सांभाळणारी पहिली महिला अधिकारी

लडाख, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्सच्या कर्नल गीता राणा या पूर्व लडाखमधील एका अग्रेषित आणि दुर्गम ठिकाणी स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची जबाबदारी हाती घेणारी पहिली महिला अधिकारी ठरली आहे. लष्कराने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. ही जबाबदारी मिळाल्याने गीता राणा यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. लष्करी अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक […]Read More

महानगर

शेतकरी नुकसान आणि कांदा खरेदी यावर विधानसभेत गदारोळ

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे त्यामुळे सर्व कामकाज बाजूला सारून यावर चर्चा करावी आणि सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी नियम ५७ अन्वये नाना पटोले यांनी केली , अध्यक्षांनी ती नाकारली , त्यावर विरोधक आक्रमक झाले , यावर मुख्यमंत्र्यानी उत्तर दिलं […]Read More

राजकीय

आता महात्मा फुले योजनेत पाच लाखांचे उपचार

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत असलेली उपचारांची सध्याची दीड लाख रुपये खर्चाची मर्यादा पाच लाख रुपये करण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली, याबाबतची लक्षवेधी सूचना राहूल पाटील यांनी उपस्थित केली होती. या योजनेत आयुर्वेदिक उपचारांचा समावेश करण्यासाठी अभ्यास समिती नेमली जाईल त्यांचा अहवाल तीन महिन्यांत […]Read More

राजकीय

शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता यातील किती गोष्टींची फलश्रृती होईल याबाबत शंकाच आहे. देवेंद्रजींच्या रुपाने एक अभ्यासू अर्थमंत्री मिळाला असे वाटले होते मात्र अर्थसंकल्प कसा लिहावा? हे पुस्तक लिहिणे आणि खराखुरा अर्थसंकल्प लिहिणे यात खूप फरक आहे. […]Read More

राजकीय

सर्वसामान्यांसाठीचा हा अर्थसंकल्प

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद फुलवणारा हा अर्थसंकल्प आहे, यामुळे राज्याची अर्थव्यवस्था देशाला साह्यभूत होईल अशी आशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.शेतकऱ्यांना सर्वप्रकारची मदत केली जाईल असं ही ते म्हणाले. अर्थसंकल्पातील वित्तीय तूट ही रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेतच आहेत , कोणत्याही […]Read More

ट्रेण्डिंग

कोकण मंडळासाठी म्हाडाची लॉटरी जाहीर

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत ४,६४० घरे आणि १४ भूखंडांच्या विक्रीसाठीच्या सोडत अर्ज नोंदणी प्रक्रियेस कालपासून (दि.८) सुरूवात झाली आहे. १० एप्रिल २०२३पर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर सोडतीत सहभागाची लिंक प्रणालीवरून बंद केली जाईल. […]Read More