श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आता अभिमत क्रीडा विद्यापीठ

 श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आता अभिमत क्रीडा विद्यापीठ

अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय पारंपरिक खेळ व क्रीडा च्या माध्यमातून समाजाला बलवान करण्याकरिता अंबादास पंत वैद्य यांनी 1914 मध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली. विश्व बलधर्म विद्यापीठ स्थापनेचे ध्येय अविरत जोपासले. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनामध्ये आज श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावतीकरांना मोठी उपलब्धी प्राप्त झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना अमरावती येथील जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा मिळणार अशी घोषणा केली.

ही घोषणा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावतीकरांसाठी आनंदोत्सवाचा क्षण ठरली. घोषणा होताच मंडळामध्ये सर्व पदाधिकारी प्रशिक्षक शिक्षक कर्मचारी वर्गांनी जल्लोष साजरा करीत मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, मंडळाच्या सचिव प्रा. डॉ.माधुरीताई चेंडके, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके यांना शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला.

मागील 109 वर्षापासून विश्व बलधर्म विद्यापीठ स्थापनेचे स्वप्न पूर्ण झाल्या निमित्त मंडळाचे सर्वेसर्वा पद्मश्री प्रभाकर वैद्य अत्यंत भाऊक झाले होते.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे विविध क्रीडा व शैक्षणिक संस्थेत देशातील विविध राज्यांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. जागतिक पातळीवर विविध खेळाच्या स्पर्धेत सहभागी होऊन पदके प्राप्त करतात.

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठा सहभाग असून या मंडळात महात्मा गांधी,नेताजी सुभाषचंद्र बोस आदी मान्यवरांनी भेटी देऊन मंडळाचे कौतुक केले आहे.Shri Hanuman Vyamya Prasarak Mandal is now the preferred sports university

ML/KA/PGB
10 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *