आदिवासी आश्रमशाळांसाठी आता सेंट्रल किचन

 आदिवासी आश्रमशाळांसाठी आता सेंट्रल किचन

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांसाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर ( सेंट्रल किचन) सुरू करण्याचा विचार आहे, असं आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.

राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांसाठी अन्नधान्य खरेदीच्या निविदा प्रक्रिया प्रलंबित असल्याबाबत भाजपाचे रमेशदादा पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. या अन्नधान्य खरेदीच्या निविदा प्रक्रिया आयुक्त स्तरावर अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गावित यांनी दिली.

आदिवासी विभागाअंतर्गत , ४९९आश्रमशाळा आहेत.या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे, असं त्यांनी सांगितलंCentral kitchen now for tribal ashram schools

ML/KA/PGB
10 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *