mmcnews mmcnews

अर्थ

या राज्यात दारुच्या प्रत्येक बाटलीवर १० रु गोमाता अधिभार

शिमला, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिमाचल प्रदेश सरकारने राज्यात दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार (Cow cess) लावण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये सर्वांत लक्षवेधी ठरली ती ‘गोमाता अधिभार’ ही घोषणा. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हिमाचल […]Read More

ट्रेण्डिंग

सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलासाठी 70,500 कोटी रु. मंजुर

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत आज लष्करासाठी आवश्यक खरेदीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल. सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलासाठी 70,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली संपादनासाठ मंजूरी देण्यात आली आहे. एकूण प्रस्तावांपैकी, भारतीय नौदलाचे प्रस्ताव 56,000 कोटींहून अधिक आहेत, ज्यात मोठ्या […]Read More

Featured

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामात राज्याचा हस्तक्षेप बेकायदेशीर

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायत आणि महापालिकांच्या कारभारात राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे , त्यांच्या माथी अनावश्यक योजना मारत असून त्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला .State interference in the work of local bodies illegal राज्यातील महानगरांतील समस्या , प्रभाग रचना फेर […]Read More

Featured

किडनी घोटाळा प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील किडनी विक्री घोटाळा आणि संबधित बाबींची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समिती करेल अशी घोषणा आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली.Inquiry committee of retired judges in kidney scam case याबाबतचा प्रश्न माधुरी मिसाळ यांनी उपस्थित केला होता, त्याला राम सातपुते , राम कदम यांनी उप […]Read More

महिला

आजपासून महिलांना एसटीच्या भाड्यात ५०% सवलत

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आजपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. […]Read More

Breaking News

आता संघाच्या शाखा वाढविण्याचे उद्दिष्ट

नागपुर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गेल्या वर्षभरापासून कार्य विस्ताराच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून देशभरात संघाच्या शाखांची संख्या ६२ हजारांवरून ६८ हजार झाली आहे. वर्षभरात सहा हजाराने संघ शाखा वाढल्या असून येत्या वर्षभरात ही संख्या एक लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य दीपक तामशेट्टीवार […]Read More

राजकीय

कोणत्याही मंत्र्याच्या कारभारात ढवळाढवळ करू नका

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री यांना कोणत्याही मंत्र्याच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही, एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय मुख्यमंत्री बदलू शकत नाही, तसेच मंत्र्याने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देऊन त्याचा फेरविचार करण्याचा किंवा तो निर्णय मुख्यमंत्री बदलू शकत नाहीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

परदेशी वकीलांना आता भारतातही प्रॅक्टीस करता येणार

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) भारतीय वकीली क्षेत्राला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बार काउन्सिलने परदेशी वकील आणि परदेशी कायदा सल्लागार कंपन्यांना भारतात प्रॅक्टीस करण्याची परवानगी दिली आहे. बीसीआय ने हा निर्णय घेतला असला तरी परदेशी वकिलांना आणि कायदे सल्लागार कंपन्यांना प्रत्यक्ष न्यायालयात येता येणार नाही. […]Read More

राजकीय

अखेर नऊ महिन्यांनंतर संपला सत्तासंघर्षावरील युक्तीवाद, निर्णय न्यायालयाकडे राखीव

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गेल्या महिन्याभरापासून चालू असलेली सुनावणी अखेर आज संपली आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी २९ जूनला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा मुद्दा उपस्थित झाला. न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. १४ फेब्रुवारीपासून १२ दिवस दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. न्यायालयाने जवळपास ४८ तास दोन्ही […]Read More

Uncategorized

अमृता फडणवीस यांनी दाखल केला डिझायनरवर लाच दिल्याचा गुन्हा

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि त्यांना धमकावून त्यांच्याविरोधात कट रचल्याप्रकरणी मुंबईतील एक डिझायनर आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिष्का असे या डिझायनर असणाऱ्या महिलेचे नाव आहे. अनिष्का हिच्या वडिलांविरोधात एका गुन्ह्याची नोंद आहे. याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी अनिष्काने […]Read More