किडनी घोटाळा प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती

 किडनी घोटाळा प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील किडनी विक्री घोटाळा आणि संबधित बाबींची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समिती करेल अशी घोषणा आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली.Inquiry committee of retired judges in kidney scam case

याबाबतचा प्रश्न माधुरी मिसाळ यांनी उपस्थित केला होता, त्याला राम सातपुते , राम कदम यांनी उप प्रश्न विचारले, या अधिवेशन काळात धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक घेऊन गरीब रुग्णांना रुग्णालयांमध्ये सवलतीत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारींबाबत चर्चा केली जाईल अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली.

जे जे रुग्णालयातही भ्रष्टाचार

मुंबईच्या जे जे रुग्णालयातील काही विभाग प्रमुखांनी इतर डॉक्टरांना हाताशी धरून केलेल्या बेकायदेशीर कामांची चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

याबाबतचा प्रश्न सुनिल प्रभू यांनी उपस्थित केला होता, या विभागप्रमुखांनी परस्पर खरेदी करून , दलाली चे पैसे स्वतंत्र बँक खात्यात जमा करून घेतले ,परदेश दौरे केले असं मंत्री म्हणाले.

ML/KA/PGB
17 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *