या राज्यात दारुच्या प्रत्येक बाटलीवर १० रु गोमाता अधिभार

 या राज्यात दारुच्या प्रत्येक बाटलीवर १० रु गोमाता अधिभार

शिमला, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिमाचल प्रदेश सरकारने राज्यात दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार (Cow cess) लावण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये सर्वांत लक्षवेधी ठरली ती ‘गोमाता अधिभार’ ही घोषणा.

राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रति बॉटल दहा रुपये गोमाता अधिभार लावल्यामुळे राज्य सरकारला वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आता दारु महागणार आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला.

हिमाचलच्या अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या तरतूदी

चार्जिंग स्टेशनसाठी राज्य सरकार 50 टक्के अनुदान देईल.

एचआरटीसीमध्ये 1500 डीजल बसला इलोक्ट्रिक बसमध्ये बदलले जाईल.

युवकांना रोजगार मिळावा यासाठी व्यावसायासाठी 40 टक्के सबसिडी देण्यात येईल.

अंगणवाडी सेविकेला महिन्याला 9500 रुपये मानधन देण्यात येईल.

अंगणवाडी मदतनीस आणि आशा सेविकांना प्रत्येकी 5200 रुपये मानधन

20 हजार मुलींना उच्च शिक्षणासाठी इलेक्ट्रिक स्कूटी खरेदीसाठी 25 हजारांचे अनुदान देण्यात येईल.

SL/KA/SL
17 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *