परदेशी वकीलांना आता भारतातही प्रॅक्टीस करता येणार

 परदेशी वकीलांना आता भारतातही प्रॅक्टीस करता येणार

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) भारतीय वकीली क्षेत्राला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बार काउन्सिलने परदेशी वकील आणि परदेशी कायदा सल्लागार कंपन्यांना भारतात प्रॅक्टीस करण्याची परवानगी दिली आहे.

बीसीआय ने हा निर्णय घेतला असला तरी परदेशी वकिलांना आणि कायदे सल्लागार कंपन्यांना प्रत्यक्ष न्यायालयात येता येणार नाही. ते त्यांच्या अशिलांना परदेशी कायदे आणि कॉर्पोरेट व्यवहारांबाबत मार्गदर्शन देऊ शकतात.

बीसीआयने १३ मार्च रोजी ‘परदेशी वकील आणि परदेशी विधि कंपन्या नोंदणी आणि नियमन, २०२२’ मध्ये बदल केला. भारतातील कायदेशीर प्रॅक्टीस आणि कायद्याच्या शिक्षणाचे नियमन करण्याची जबाबदारी बीसीआयवर आहे. मागच्या काही दशकांपासून बीसीआय परदेशी विधि कंपन्यांना विरोध करत होती.

SL/KA/SL

16 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *