भायखळा येथील वाळवण महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद

 भायखळा येथील वाळवण महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि १२
बृहन्मुंबई महानगरपालिका (नियोजन विभाग) आयोजित वाळवण महोत्सव २०२६’ महोत्सवाचे आयोजन नुकतेच भायखळा येथील इ वॉर्ड कार्यालयात करण्यात आले होते. त्यास विभागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध पदार्थांची खरेदी केली. खास महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थ महोत्सवास आमदार मनोज जामसुतकर तसेच नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या समवेत भेट देऊन विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या विविध पारंपरिक पदार्थांची पाहणी केली.
यावेळी उपस्थित व्यापारी बंधू-भगिनींशी संवाद साधत त्यांनी पदार्थांच्या निर्मिती प्रक्रिया, गुणवत्ता आणि व्यवसायातील अनुभवांची माहिती जाणून घेतली तसेच महिलांच्या माद्यमातून राबविण्यात येणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी नगरसेवक धनराज निकम त्याच प्रमाणे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपक्रमाला भेट देण्यास मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *