mmcnews mmcnews

Featured

दादा भडकले, फडणवीसांची दिलगिरी

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सभागृहात मंत्री सातत्याने अनुपस्थित राहत असल्यामुळे सभागृहाच्या परंपरेला बाधा येत आहे, अशी काय कामे असतात मंत्र्यांना , पद घेताना मागे मागे फिरतात , संसदीय कामकाज मंत्री देखील अनुपस्थित राहतात , सभागृहात तहकूब करण्याची नामुष्की ओढवली आहे, हे गलिच्छ पणाचे कामकाज ,इथल्या कामात कोणालाही रस नाही, हा निर्लज्ज पणाचा कळस गाठला […]Read More

Breaking News

अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी विशेष व्यवस्था

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी रोहित्र खराब अथवा नादुरुस्त झाल्यास ते त्वरित बदलून त्याठिकाणी नवीन लावण्याची व्यवस्था केली जाईल मग मूळ रोहित्र दुरुस्त करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतचा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता, यावर प्राजक्त तनपुरे, अशोक चव्हाण आदींनी […]Read More

Featured

शिक्षणाचा उपयोग कृषी विकासासह देशाच्या समृद्धीसाठी करा

रत्नागिरी, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केले. विद्यापीठाचा 41 वा पदवीदान समारंभ दापोली येथील अध्यापिठाच्या डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास प्रकुलपती व कृषी मंत्री […]Read More

Featured

सरकार सादर करणार अर्थसंकल्पाचा आढावा अहवाल

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पतील घोषणांची आणि योजनांची अंमलबजावणी किती झाली याचा आढावा घेणारा अहवाल पुढील अर्थसंकल्पापूर्वी सभागृहात मांडला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली, अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला ते उत्तर देत होते.The government will present the review report of the budget अर्थसंकल्पातील पंचामृत सगळ्यांनाच मिळेल ,राज्याच्या अर्थव्यवस्थेची […]Read More

ट्रेण्डिंग

येथे होणार महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा

पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रीडा क्षेत्रात करिअर घडवू इच्छीणाऱ्या देशातील आणि राज्यातील महिलांसाठी सध्या सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहेत. सध्या देशभर पहिल्या महिला IPL स्पर्धेचा जल्लोश सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रात पुरूष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणेच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगली येथे रंगणार आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी […]Read More

मनोरंजन

लवकरच येणार ‘RRR’ चा सिक्वेल

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. बेस्ट ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. या इंटरनॅशनल अवॉर्ड फंक्शनमध्ये स्वत: एसएस राजामौली यांनी एका […]Read More

महानगर

गिरणी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलनाचा इशारा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईसह राज्यातील एनटीसीच्या 6 गिरण्या गेल्या 3 वर्षांपासून बंद असून, या गिरण्यांतील कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या 25 हजार कुटुंबियांच्या उपासमारीला अंत उरलेला नाही. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने प्रथमच कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसह रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या शुक्रवार ता.17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान […]Read More

राजकीय

शेतकऱ्यांना आता वीज सौरऊर्जा ग्रीड मधून

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी आठ हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे ग्रीड तयार करण्यात येत असून त्यातील पहिल्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आलं आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली, विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या नियम २९३ अन्वयेच्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या चर्चेला ते उत्तर देत होते. सध्याची […]Read More

आरोग्य

पुण्यात आढळले H3N2 चे २२ रुग्ण

पुणे,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हळूहळू देशभर हातपाय पसरू लागलेल्या H3N2 व्हायरस ने आता पुणेकरांना धडकी भरवली आहे, पुण्यात H3N2 चे २२ रुग्ण आढळले आहे. तर देशभरात आतापर्यंत २ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू […]Read More

राजकीय

ठाकरे कुटुंबियाना उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय पेचामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या ठाकरे कुटुंबाला आज मुंबई उच्च न्यायालयाने संपत्तीबाबतच्या एका याचिकेत मोठा दिलासा दिला.गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबाबत उच्च न्यायालयात याचिका केली. केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते.मात्र, […]Read More