पुण्यात आढळले H3N2 चे २२ रुग्ण

 पुण्यात आढळले H3N2 चे २२ रुग्ण

पुणे,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हळूहळू देशभर हातपाय पसरू लागलेल्या H3N2 व्हायरस ने आता पुणेकरांना धडकी भरवली आहे, पुण्यात H3N2 चे २२ रुग्ण आढळले आहे. तर देशभरात आतापर्यंत २ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. या विषाणूची साथ पुण्यात मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हायरसची लक्षणं ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहे. त्यामुळे जीवघेणी बाब नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे

सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्य सरकारांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

SL/KA/SL

14 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *