सरकार सादर करणार अर्थसंकल्पाचा आढावा अहवाल

 सरकार सादर करणार अर्थसंकल्पाचा आढावा अहवाल

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पतील घोषणांची आणि योजनांची अंमलबजावणी किती झाली याचा आढावा घेणारा अहवाल पुढील अर्थसंकल्पापूर्वी सभागृहात मांडला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली, अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला ते उत्तर देत होते.The government will present the review report of the budget

अर्थसंकल्पातील पंचामृत सगळ्यांनाच मिळेल ,राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाढ समाधानकारक आहे, आस्थापना खर्चाचा वाटा कमी करून विकास खर्चाचा वाटा वाढवण्यात आला आहे असं ही फडणवीस म्हणाले.

राज्याचे जी एस टी संकलन एक लाख अठरा हजार कोटी इतके असून ते देशात सर्वात जास्त आहे . वित्तीय तूट कमी राखण्यात यश आलं आहे, राज्यातील गुंतवणूक दोन लाख ३७ हजार कोटींनी वाढली आहे, त्यात दावोस मधील गुंतवणुकीचा समावेश नाही , तो केला तर हा आकडा आणखी वाढेल असं ते म्हणाले.

जुन्या पीक विमा योजनेत केवळ पंचवीस लाख शेतकऱ्यांचा समावेश होता,त्यांना ५७८ कोटी रुपयांचा विमा मिळाला, मात्र आम्ही एका रुपयात विमा नोंदणी सुरू केल्यानंतर त्याचा लाभ एक कोटी पंचवीस लाख शेतकऱ्यांना मिळेल तर त्यापोटी २८८० कोटी रुपये मिळू शकतील असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

जुन्या पेन्शन योजनेच्या विरोधात आम्ही नाही मात्र पुन्हा ती स्वीकारायची असेल तर तिचं दायित्व किती ते पाहिल्याशिवाय त्याबाबत नव्याने निर्णय घेणं शक्य नाही, म्हणून त्यासाठी नव्याने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे असं फडणवीस म्हणाले. संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन ही त्यांनी यावेळी केले. The government will present the review report of the budget

ML/KA/PGB
15 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *