नाशिक दि ३० : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य येथे प्रथमच ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ (रोजी पेलिकन) या दुर्मिळ पक्ष्यांचे आगमन झाल्याने निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. २८ मार्च २०२६ रोजी या पक्ष्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून, महाराष्ट्रासाठी ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे. अभयारण्याच्या नोंदींनुसार, यापूर्वी […]Read More
अलिबाग दि ३० – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नानोरे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान एक अनोखी आणि थरारक घटना उघडकीस आली. महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यात चक्क मगरींची दोन पिल्ले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र, कामगारांच्या समय सूचकतेमुळे आणि वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे या पिल्लांना सुरक्षित नवजीवन मिळाले. माणगाव बायपास […]Read More
सोलापूर दि २९ : हरिभाई देवाकरण प्रशाला , सिध्देश्वर पेठ , सोलापूर या ठिकाणी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२६ संपन्न झाली.या स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने सुरू असलेल्या मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील महिला पैलवान कुमारी डॉली गुप्ता हिने कांस्य ð¥ पदकाची कमाई केली. या स्पर्धेत तिचा पहिला सामना कोल्हापूरच्या […]Read More
मुंबई, दि. २९ : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबद्दलची कार्यपद्धती निश्चित करून शासनाने आदेश जारी केला आहे. मोजणी प्रकरणांचे निश्चित वेळापत्रक ठरवून […]Read More
मुंबई, दि २९“वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या महानगरपालिका शाखांच्या प्रलंबित अनुदान वाढीसाठी मी पूर्णपणे सकारात्मक आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिली. दादर (पूर्व) स्थित मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित ‘मुंबई शहर […]Read More
मुंबई, दि २९सीएसटी येथील रेल्वे मुख्यालयासमोर पदपथावरील पेव्हर ब्लॉक उखडल्यामुळे पादचारी आणि नागरिक पाय अडकून पडत आहेत. या पदपथावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये – जा सुरु असते. तसेच या परिसरात या परिसरात मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खाजगी कंपन्यांची कार्यालये असल्यामुळे या पदपथावरून रोज हजारो चाकरमानी ये – जा करत असतात. तसेच महापालिका मुख्य कार्यालय देखील […]Read More
मुंबई, दि २९ मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नुकतीच मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे निर्णायक बैठक संपन्न झाली.या बैठकीचे आयोजन माननीय महापौर रितू तावडे आणि सभागृह नेते गणेश खणकर यांनी केले होते.भाजपा बेस्ट कामगार संघाने सन २०२१ पासून ते आतापर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. बैठकीदरम्यान संघाने गेल्या ५ […]Read More
यवतमाळ दि. २९ (आनंद कसंबे ) : केल्याने होते आहेरे आधी केलेची पाहिजे, या म्हणीची पुन्हा प्रचिती येते जेव्हा आपण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील तरुण शेतकरी अमोल घाटे यांचा फुलशेतीचा प्रयोग पाहू.अमोल घाटे यांचा व्यवसाय फुल, फुलमाळा तथा पुष्पगुच्छ विक्रीचा. यासाठी ते बाहेरुन फुले विकत आणायचे. साहजिकच यात त्यांचे बरेच पैसे खर्च व्हायचे. वाट पाहण्यातही […]Read More
मुंबई, दि. २८ :.राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन पोर्टल, वन वेब ॲड्रेस’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना पुढे आणली असून त्याअंतर्गत ‘महासारथी’ (MahaSarathi) पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे विविध शासकीय सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊन नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळणार आहेत. […]Read More
मुंबई, दि. २८ : राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमुळे भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा वेगवान निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात ५७ नवीन लवादांची नियुक्ती केली असून, यामुळे अनेक वर्षांपासून मोबदल्याविना रखडलेले २८ हजारांहून अधिक प्रकल्पग्रस्तांचे दावे आता जलदगतीने निकाली निघणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन यासाठी विशेष […]Read More