Month: November 2024

पश्चिम महाराष्ट्र

बाबा आढावांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा

पुणे, दि.३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून २८ नोव्हेंबर महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]Read More

देश विदेश

55 वे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सिनेमॅटिक उत्कृष्टतेच्या नेत्रदीपक प्रदर्शनाने दिमाखात समारोप झाला , ज्यात चित्रपट निर्माते, अभिनेते आणि उद्योग व्यावसायिक कथा सादरीकरणाची कला साजरी करण्यासाठी एकत्र आले होते. इफ्फीमध्ये ‘लंपन’ या मराठी वेबसिरिजला ‘सर्वोत्कृष्ट वेब सीरिज’चा पुरस्कार मिळाला आहे. लिथुआनियन चित्रपट टॉक्झिकने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रतिष्ठित सुवर्णमयुर पुरस्कार […]Read More

पर्यटन

पर्यटन विकासासाठी महाराष्ट्राला केंद्राकडून १५० कोटी

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोकण आणि नाशिककरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. Ex INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, […]Read More

राजकीय

अदानी प्रकरणी गदारोळामुळे सलग तिसऱ्या दिवशी लोकसभा, राज्यसभा स्थगित

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी अदानींचा विषय चांगलाच लावून धरला आहे. उद्योगपती गौतम अदानीविरोधात २ हजार कोटींची लाच दिल्याचा आरोपावरून अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्यावरुन आज तिसऱ्या दिवशीही विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित झाली.लोकसभेचे कामकाज सुरु होताच वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या प्रियंका गांधी आणि नांदेडमधून निवडून […]Read More

ट्रेण्डिंग

या देशाकडून १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मिडियाच्या अती वापरामुळे लहान मुलांवर होणाऱ्या विपरित परिणामांबाबत जगभर चर्चा सुरु असते. मात्र याच्या वापरावर नियमन ठेवणारा ठोस धोरण मात्र याआधी जाहीर झाले नव्हते. मात्र आता ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे विधेयक नुकतेच मंजूर केले आहे. या विधेयकावर अंतिम मोहोर उमटवण्याची जबाबदारी आता सिनेटवर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार

पुणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कथा, पटकथा, संवादलेखक आणि गीतकार क्षितीज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री ठरला, खातेवाटपावरून अडले नवीन सरकारचे घोडे

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती किती एकसंध आहे आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत अशा प्रकारच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी काल रात्री दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला असला तरी आपल्यालाच महत्त्वाची खाती मिळावी यासाठी तिन्ही पक्षांचे नेते अडून बसल्याने खाते वाटपावरून आता राज्यातल्या नवीन सरकारचे […]Read More

विदर्भ

शिवशाही बसचा अपघात, 11 लोकांचा मृत्यू …

गोंदिया, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट च्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात मृतांचा आकडा वाढला असून आता एकूण मृतकांची संख्या 11 वर पोहोचली आहे. 23 प्रवासी जखमी असून 11 प्रवासी गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर गोंदिया जिल्ह्यातील केटीएस रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. यामध्ये अजूनही मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृतकांसाठी मुख्यमंत्री […]Read More

राजकीय

देशाच्या शांततेसाठी बौद्धांनी कायद्याची कट ऑफ तारीख स्वीकारली

मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क): आपल्या देशातील सांप्रदायिक शांतता आणि सौहार्द बिघडू नये म्हणून बौद्ध धर्मीयांनी प्रार्थना स्थळांच्या कायद्याची कट-ऑफ तारीख स्वीकारली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. “भारताचा इतिहास हा बौद्ध आणि ब्राह्मणवाद यांच्यातील नश्वर संघर्षाचा इतिहास आहे,” असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाचा ऐतिहासिक दाखला ॲड. […]Read More

राजकीय

एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ […]Read More