55 वे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सिनेमॅटिक उत्कृष्टतेच्या नेत्रदीपक प्रदर्शनाने दिमाखात समारोप झाला , ज्यात चित्रपट निर्माते, अभिनेते आणि उद्योग व्यावसायिक कथा सादरीकरणाची कला साजरी करण्यासाठी एकत्र आले होते. इफ्फीमध्ये ‘लंपन’ या मराठी वेबसिरिजला ‘सर्वोत्कृष्ट वेब सीरिज’चा पुरस्कार मिळाला आहे.
लिथुआनियन चित्रपट टॉक्झिकने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रतिष्ठित सुवर्णमयुर पुरस्कार पटकावला तर रोमानियन दिग्दर्शक बोगदान मुरेसानु यांनी ‘द न्यू इयर दॅट नेव्हर केम’ साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार पटकावला.
लिथुआनियन चित्रपट टॉक्सिक ने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सर्वात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. सॉल ब्लियुवेट यांनी निर्माता गिड्रे बुरोकेट यांच्यासह सुवर्ण मयूर ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 40 लाख रुपयांचे रोख पारितोषिक स्वीकारले.
ज्युरींनी या चित्रपटाची संवेदनशीलता आणि सहानुभूतीबद्दल प्रशंसा केली, ज्यात वास्तविक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर बदलत्या काळाचा वेध घेणारे कथानक मांडले आहे. टॉक्सिक हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.”पौगंडावस्थेतील बदलांचा तसेच आर्थिकदृष्ट्या वंचित समाजात मोठे होत जाण्यातील वास्तविकतेचा शोध अत्यंत संवेदनशीलता आणि सहानुभूतीने घेत जाणारी आणि त्याच वेळी बदलत्या काळाचा वेध घेणारी ही कथा वास्तविक आणि सामाजिक परिदृश्याच्या पार्श्वभूमीवर घडते,” असे मत ज्युरींनी व्यक्त केले.
- सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण मयूर : टॉक्झिक
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी रौप्य मयूर : बोगदान मुरेसानू
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार (पुरुष आणि स्त्री):
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनय कौशल्याचा सन्मान करत सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (स्त्री) यांना रौप्य मयूर सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 10,00,000 रुपये रोख देऊन गौरवण्यात येते.
- सर्वोत्कृष्ट अभिनेता(पुरुष) साठीचा रौप्य मयूर पुरस्कार : क्लिमेंट फाव्यू
- सर्वोत्कृष्ट अभिनेता(स्त्री) साठीचा रौप्य मयूर पुरस्कार : व्हेस्टा मॅटलाईट आणि लेवा रुपीकायटे यांना देण्यात आला.
- विशेष परीक्षक पारितोषिकासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार : लुईस कोउवीसीएर
- दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : सारा फ्रिडलँड
लंपन”सर्वोत्कृष्ट वेब सीरिज’
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील वेब सीरिज सोबतच मराठी सीरिजही गाजताना दिसत आहेत.सोनी लिवच्या प्रतिष्ठित मराठी ओरिजिनल सीरिज ‘लंपन’च्या शिरपेचात आता मनाचा तुरा रोवला गेला आहे.५५व्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात इफ्फीमध्ये ‘लंपन’ला ‘सर्वोत्कृष्ट वेब सीरिज’चा पुरस्कार मिळाला आहे.
प्रकाश नारायण संत यांच्या कालातीत कादंबरी ‘वनवास’वर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये गीतांजली कुलकर्णी यांनी ‘लंपन’ची आजी, चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘लंपन’चे आजोबा, मिहिर गोडबोले याने ‘लंपन’ची, तर कदंबरी कदम यांनी ‘लंपन’ची आई आणि पुष्कराज चिरपुटकर यांनी ‘लंपन’च्या बाबांची आणि अवनी भावे हिने ‘सुमी’ अशा प्रमुख भूमिका सकरल्या आहेत. या सीरिजची कथा आणि निर्मिती श्रीरंग गोडबोले, हृषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन आणि चिंतामणी वर्तक यांनी केली असून, दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांचे आहे.’लंपन’ ही एक हृदयस्पर्शी कथा आहे जी, मैत्रीची आणि आत्मविश्वासाची प्रेरणा देणारी आहे.’लंपन’च्या प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना जीवनाच्या साध्या आनंदांची आणि प्रेमाच्या अमर शक्तीची आठवण करून दिली जाते.
SL/ML/SL
29 Nov. 2024