शिवशाही बसचा अपघात, 11 लोकांचा मृत्यू …
गोंदिया, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट च्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात मृतांचा आकडा वाढला असून आता एकूण मृतकांची संख्या 11 वर पोहोचली आहे. 23 प्रवासी जखमी असून 11 प्रवासी गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर गोंदिया जिल्ह्यातील केटीएस रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. यामध्ये अजूनही मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृतकांसाठी मुख्यमंत्री निधीतून दहा लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे.
याविषयी गोंदिया जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांनी 34 पैकी 11 प्रवासांचा मृत्यू झाल्याची अधिकृत सांगितलेला आहे. एकंदरीत बस मध्ये 34 प्रवासी हे जखमी झाले होते, त्यापैकी 2 प्रवाशांवर गोरेगाव येथे उपचार सुरू आहे , तर दहा प्रवासांचा सडक अर्जुनी इथे उपचार सुरू आहे. 22 प्रवाशांना उपचारासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते यापैकी 11 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला असून उर्वरित 11 लोकांवर सध्या उपचार सुरू आहे असे सांगितले.
मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे :-
1) स्मिता विक्की सुर्यवंशी, वय- 32 वर्ष, राहणार- अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
2) मंगला राजेश लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे, वय- 65 वर्ष, राहणार- वरोरा, जि.चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे, वय- 65 वर्ष, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
6) अंजिरा रामचंद्र कनोजे, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
7) आरिफा अजहर सय्यद, वय- 42 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
8) अजहर अली सय्यद, वय- 45 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
9) नयना विशाल मिटकर, वय- 35 वर्ष, राहणार- बेसा, नागपूर
टीप : मृत्यू पावलेल्या 2 प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही.
एकूण 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे.
ML/ML/SL
29 Nov. 2024