Month: April 2024

मराठवाडा

खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरची झाली एमर्जेंसी लँडिंग…

जालना, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील चनेवाडी शिवारात एका हेलिकॉप्टरची अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली त्यामुळे ते पाहायला स्थानिकांनी मोठी गर्दी केली .सदर हेलिकॉप्टर छत्रपती संभाजी नगर येथून रवाना होऊन नागपूरकडे खाजगी कामानिमित्त जात होते. यादरम्यान हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बाब पायलट इम्रान गौरी यांच्या लक्षात आली. यावेळी त्यांनी तातडीने […]Read More

गॅलरी

पराग उर्फ राजाभाऊ वाजे यांचा अर्ज दाखल

नाशिक, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २१ नाशिक लोकसभा मतदार संघातून पराग प्रकाश वाजे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या कडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 20 दिंडोरी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे भास्कर मुरलीधर भगरे यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी […]Read More

गॅलरी

राजन विचारे यांचा अर्ज दाखल

ठाणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे आज दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत आमदार जितेंद्र आव्हाड, विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे, मुलगी लतिका विचारे, धनश्री विचारे हे उपस्थित होते. ML/ML/SL 29 April […]Read More

खान्देश

नाशिक शहरात तपमानाचा उच्चांक, ४१ अंश सेल्सीअसची नोंद

नाशिक, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आज कमाल तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे. आज ४१ .२ अंश सेल्सीअस इतकी उच्चांकी नोंद झाल्याचे वेधशाळेने कळवले आहे. गेल्या आठवड्यात चार दिवस नाशिकमध्ये ४० अंश सेेल्सीअस पेक्षा अधिक तापमान होते. मात्र, त्यानंतर अवकाळी पाऊस झाला आणि वातावरण काहीसे थंड […]Read More

देश विदेश

‘गुलाबी साडी’ ठरले ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणारे पहिले मराठी गाणे

न्यूयॉर्क, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : गायक संजू राठोड यांचे गुलाबी साडी हे गाणे सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. माधुरी दिक्षित, रेमो डिसुझा या सेलिब्रिटींनाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह झाला एवढे हे गाणे लोकप्रिय झाले आहे. गुलाबी साडी’ या गाण्याला ‘यूट्यूब’वर 70 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘स्पॉटीफाय’वरही या गाण्याने 15 मिलियनचा […]Read More

देश विदेश

६००कोटींच्या ड्रग्जसह १४ पाकिस्तानी तस्करांना अटक

अहमदाबाद, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एटीएस आणि एनसीबीने १४ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ६०० कोटी रुपयांचे ८६ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एटीएस येत असल्याची माहिती मिळताच 14 पाकिस्तानी नागरिकांनी […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईतून लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी सखोल तपास केला. या तपासातून पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीत एका डॉक्टराचादेखील समावेश आहे. तसेच आरोपी हे मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये काम करत असल्याची […]Read More

Lifestyle

श्रीखंड पाय, नक्की बनवा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काहीतरी हटके लागणारे जिन्नस:  १४ औंसांचा स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्कचा कॅनअर्धा कप होल फॅट प्लेन ग्रीक योगर्टएक तृतियांश कप लिंबूरस८ ईंची तयार ग्रॅहॅम क्रॅकर Pie क्रस्टआवडीनुसार सुका मेवा, वेलची, केशर, जायफळ इ. क्रमवार पाककृती:  ओव्हन ३५० डिग्री फॅरनहाइटला प्रीहीट करत ठेवा.मिक्सिंग बोलमध्ये कन्डेन्स्ड मिल्क, योगर्ट आणि लिंबाचा रस फेटून […]Read More

अर्थ

मागील आठवड्यातील घसरण रोखण्यात बाजाराला (Stock Market)यश

मुंबई, दि. २८ (जितेश सावंत ) : मागील आठवड्यात इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, मध्यपूर्वेतील तणावामुळे आशियाई तसेच अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे बाजार सुमारे 1.6% घसरला होता. गुंतवणूकदारानी बाजारातून पैसे काढण्याच्या सपाटा लावला होता. त्यातच युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली त्याच्याही फटका बाजाराला बसला. भारत-मॉरिशस कर करारकर सवलतींचा गैरवापर आणि चोरी टाळण्यासाठी भारताने मॉरिशससोबत दुहेरी […]Read More

खान्देश

मालेगाव शहरात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव, एक मृत्यू…

नाशिक, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालेगाव शहरात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव झाला असून त्यात एका माजी कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मालेगाव महानगर पालिकेचे आरोग्य विभाग अलर्ट झाले असून त्या मृत्यू झालेल्यांच्या घरातील व्यक्ती, परिसरातील व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांची देखील आरोग्य तपासणी केली जात आहे. कोणालाही […]Read More