नाशिक शहरात तपमानाचा उच्चांक, ४१ अंश सेल्सीअसची नोंद

 नाशिक शहरात तपमानाचा उच्चांक, ४१ अंश सेल्सीअसची नोंद

नाशिक, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आज कमाल तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे. आज ४१ .२ अंश सेल्सीअस इतकी उच्चांकी नोंद झाल्याचे वेधशाळेने कळवले आहे. गेल्या आठवड्यात चार दिवस नाशिकमध्ये ४० अंश सेेल्सीअस पेक्षा अधिक तापमान होते.

मात्र, त्यानंतर अवकाळी पाऊस झाला आणि वातावरण काहीसे थंड झाले. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवत असून आज यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये वाढत्या उन्हाळ्यामुळे प्रथमच जिल्ह्राातील सर्व शासकीय रूग्णालये तसेच नाशिक महापालिकेच्या रूग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

ML/ML/SL

28 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *