‘गुलाबी साडी’ ठरले ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणारे पहिले मराठी गाणे

 ‘गुलाबी साडी’ ठरले ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणारे पहिले मराठी गाणे

न्यूयॉर्क, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : गायक संजू राठोड यांचे गुलाबी साडी हे गाणे सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. माधुरी दिक्षित, रेमो डिसुझा या सेलिब्रिटींनाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह झाला एवढे हे गाणे लोकप्रिय झाले आहे. गुलाबी साडी’ या गाण्याला ‘यूट्यूब’वर 70 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘स्पॉटीफाय’वरही या गाण्याने 15 मिलियनचा टप्पा पार केला आहे.तसेच ‘यूट्यूब’वरील जागतिक स्तरावरच्या उच्चांक गाठणा-या व्हिडीओंमध्ये आणि ‘स्पॉटीफाय’च्या जागतिक वायरल गाण्यांमध्ये ‘गुलाबी साडी’ गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता या गाण्याने अजून एक विक्रम केला आहे. ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Gulabi Sadi) मिळाला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संजू राठोड म्हणाला की, गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना हे इतकं यश मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता. अल्पावधीतच एवढं यश मिळालं यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी मिलियन व्ह्यूज चा टप्पा पार केला हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. त्यात आता न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर माझं गाणं झळकलं यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे. माझा आनंद मला शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. हे सगळं शक्य झालं ते माझ्या चाहत्यांमुळे. त्यांनी माझ्या गाण्यांना दिलेल्या प्रतिसादामुळे. त्यांच्या प्रेमामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली आहे. चाहत्यांते ऋण मी कधीही विसरणार नाही.अशीच नवनवीन गाणी मी त्यांच्यासाठी कायम करत राहीन.

‘गुलाबी साडी’ या गाण्याच्या भरघोस प्रतिसादानंतर संजू राठोड आणि ‘बिग हिट मीडिया’ एक नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलं आहे. या गाण्यात ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील थिरकताना दिसत असून संजू राठोडच्या रॅपने साऱ्यांची बोलतीच बंद केली आहे. तर या गाण्यात सहकलाकार म्हणून हृतिक मनी आणि निमरित मनी यांनीही ठेका धरलेला पाहायला मिळतोय. ‘Bride तुझी नवरी’ हे गाणं संजू राठोडचं असून ‘बिग हिट’ मीडिया प्रस्तुत आहे

SL/ML/SL

28 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *