Month: March 2024

देश विदेश

तब्बल 20 दिवसांनी सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण

लडाख, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांनी २० दिवसांपासून सुरू असले उपोषण अखेर सोडले आहे. लडाखच्या जनतेच्या मागण्यांसाठी ते 6 मार्चपासून उपोषणावर होते. सोनम वांगचुक लडाखला पूर्ण राज्य, स्थानिक लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, लेह आणि कारगिलसाठी प्रत्येकी एक संसदीय जागा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी या मागण्यांसाठी […]Read More

विदर्भ

प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी दाखल

चंद्रपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी मोठी रॅली चंद्रपूर शहरातून काढण्यात आली, या रॅलीने काँग्रेसच्या लोकसभेतील प्रचाराचा प्रारंभ झाला, या लोकसभेच्या तिकिटासाठी रस्सीखेच झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मात्र रॅली या सभेला अनुपस्थित होते. चंद्रपूरच्या न्यू इंग्लिश शाळा मैदानावर रॅलीचा समारोप […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

खासदार उदयनराजे भोसले यांनी केले साताऱ्यात शक्तिप्रदर्शन

सातारा, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) लोकसभा मतदारसंघ महायुती मधून भाजप पक्षाला सोडावा अशी वारंवार मागणी आपण केली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघावर दावा करीत होता. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे भाजप वरिष्ठ नेते अमित शहा यांच्याशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मित्र पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर भाजप पक्षाची उमेदवारी आपल्यालाच आहे असा दावा करीत […]Read More

राजकीय

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटात नाराजी

नाशिक, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना आज उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यापूर्वी पक्षाचे लोकसभा प्रमुख विजय करंजकर यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी उमेदवारी फिरवल्याने नाराज झालेल्या करंजकर समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची […]Read More

महानगर

शिवसेना उबाठा ची यादी जाहीर , आघाडीत झाली बिघाडी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा पक्षाने आपले सतरा उमेदवार आज जाहीर केले असून त्यावर काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, हे आघाडी धर्माचे सरळ उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. तिकडे वंचित बहुजन आघाडी ने आपले उमेदवारही जाहीर करून टाकले आहेत. शिवसेना उबाठा पक्षाच्या यादीत माजी मंत्री अनंत गीते , […]Read More

महानगर

सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदी नियुक्ती

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1990 च्या तुकडीत आयपीएस अधिकारी व महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदानंद दाते यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मुंबई पोलीस दलात त्यांनी कायदा व सुव्यवस्था सहपोलीस आयुक्तपद भूषवले होते. याशिवाय मिरा-भाईंदर पोलीस […]Read More

राजकीय

गडचिरोलीतील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज दाखल

गडचिरोली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोली येथे उपस्थित होते. महाविकास आघडीने रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले आणि अर्ज […]Read More

मराठवाडा

मंत्री अब्दुल सत्तार प्रकरणी दोन महिन्यात कारवाई करण्याचे आदेश

छ. संभाजी नगर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उच्च न्यायालय छत्रपती संभाजी नगर चे न्यायाधीश शैलेश पी. ब्राह्मे आणि मंगेश एस. पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या सीआयडी चौकशी प्रकरणात आठ आठवडे म्हणजेच दोन महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार निधीचा गैरवापर केल्याचे हे प्रकरण चौदा […]Read More

पर्यावरण

राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात

अकोला, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांमध्ये नोंद असणाऱ्या अकोला शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून 26 मार्च रोजी अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून तापमानामुळे नागरीक हैराण झाले आहेत. अकोल्यात काही दिवसापासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून मार्च महिन्या अखेरीस तापमान 41.5 अंश सेल्सिअस पोहचले आहे, […]Read More

राजकीय

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून ९ उमेदवार जाहीर !

अकोला दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यातील हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यावेळी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते अशोकभाऊ सोनोने, राज्य […]Read More