Month: August 2023

क्रीडा

भारतीय हॉकी संघ आशियाई करंडकच्या अंतिम फेरीत दाखल

चेन्नई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी उपांत्य फेरीच्या लढतीत जपान संघावर ५-० असा दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक या प्रतिष्ठेच्या हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली तीन वेळच्या चॅम्पियन भारतीय संघाने उपांत्य सामन्यात जपानचा पराभव केला. आकाशदीप (१९ वा मि.), […]Read More

Uncategorized

पुण्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी ५० हजार कोटींचे उड्डाणपूल

पुणे, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी ५० हजार कोटींचे उड्डाणपूल उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू तसेच पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पुणे शहरात एनडीए चौकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते […]Read More

राजकीय

अजितदादा म्हणतात, ‘मॉनिटरींग कक्षा’ची भूमिका’वॉर रुम’साठी पूरकच

मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकण, नाशिक, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या पायाभूत विकासप्रकल्पांच्या उभारणीतील अडथळे तात्काळ दूर व्हावेत, विकासाची कामे विनाविलंब मार्गी लागावीत यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून कार्यरत असून हा कक्ष मुख्यमंत्री महोदयांच्या ‘वॉर रुम’ला सहाय्यक, पूरक भूमिका बजावत आहे. ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’चा उद्देश राज्याच्या विकासकामातील अडथळे दूर […]Read More

मराठवाडा

सुंदर बसस्थानक अभियानांत अंबाजोगाई प्रथम

बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील ५६० एसटी स्थानकातील पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अंबाजोगाई बसस्थानक हे ग्रामीण भागातील मध्यवर्ती बस स्थानक आहे या ठिकाणाहून, औरंगाबाद, पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. […]Read More

गॅलरी

अजितदादांनी केला पुणे मेट्रोतून प्रवास

पुणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास आणि एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी रुबी हॉल ते वनाझ दरम्यान पुणे मेट्रोनं प्रवास करुन प्रवासी नागरिकांशी संवाद साधला. ML/KA/SL 12 Aug 2023Read More

गॅलरी

दालमिया सिमेंट कंपनीत कन्वेयर बेल्टला आग

चंद्रपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नारंडा येथील डालमीया सिमेंट उद्योगात कनवेयर बेल्टला आग लागली. आग वेगाने पसरत असल्यामुळे कंपनीत गोंधळाचे वातावरण पसरले. या कन्व्हेअर बेल्टने सिमेंटसाठी लागणाऱ्या दगडाची आवक केली जाते. मात्र तो बेल्ट अधिक गरम झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच लागलीच अग्निशमन दलाच्या […]Read More

बिझनेस

सलग तिसऱ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बाजार(Stock Market) घसरला

मुंबई, दि. १२ (जितेश सावंत) : 11 ऑगस्ट रोजी संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बाजार घसरला.मार्केटने 5 महिन्यांत पहिल्यांदाच सलग तीन आठवडे नुकसान नोंदवले. सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी 0.5% पेक्षा जास्त घसरले तर मिडकॅप इंडेक्स 0.5% वाढले. महागाईच्या अंदाजात वाढ केल्याने आणि बँकांसाठी अतिरिक्त 10 टक्के वाढीव रोख राखीव प्रमाण (ICRR) कायम ठेवण्याच्या रिझर्व्ह […]Read More

महानगर

समान नागरी कायद्यामुळे कुणालाही धोका नाही  

ठाणे, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समान नागरी कायद्यामुळे कुणालाही धोका वाटण्याचे कारण नाही. याउलट आपण सर्वानीच या कायद्याला समर्थन देण्याची गरज आहे. असा ठाम विश्वास केरळचे राज्यपाल आणि ज्येष्ठ अभ्यासक , विचारवंत आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने ठाण्यात शुक्रवारी आयोजित केलेल्या समान नागरी कायदा कशासाठी आणि कसा? या विषयावरील […]Read More

ट्रेण्डिंग

हिंसाचार करणाऱ्यांच्या रुग्णांना आता नाकारले जातील उपचार

मुंबई,दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना एकेकाळी देव मानले जात असे. परंतु आता काही कारणास्तव उपचारा दरम्यान रुग्ण दगावल्यास किंवा मनाजोगते उपचार न झाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण केल्याच्या बऱ्याच घटना आढळून येतात. मात्र आता आतताई वृत्तीला लगाम बसणार आहे. कारण आता अशाप्रकारे ड़ॉंक्टरांशी हिंसक वागणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्यांना उपचार नाकारण्याचा अधिकार […]Read More

अर्थ

देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात यावर्षी १५ टक्के वाढ

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चालू आर्थिक वर्षात 10 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक आधारावर 15.73 टक्क्यांनी वाढून 6.53 लाख कोटी रुपये झाले आहे. सरकारने सांगितले की, 1 एप्रिल 2023 ते 10 ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 69,000 कोटी रिफंड जारी करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत दिलेल्या परताव्यापेक्षा हे प्रमाण 3.73 […]Read More