सुंदर बसस्थानक अभियानांत अंबाजोगाई प्रथम

बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील ५६० एसटी स्थानकातील पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
अंबाजोगाई बसस्थानक हे ग्रामीण भागातील मध्यवर्ती बस स्थानक आहे या ठिकाणाहून, औरंगाबाद, पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. अंदाजे दिवसाला ६० ते ७० हजार प्रवासी प्रवास करतात. बस स्थानकात प्रवाश्यांसाठी सुंदर आसन व्यवस्था करण्यात आली आहे. जाणाऱ्या येणाऱ्या बसेस ची माहिती मिळावी यासाठी ठिकठिकाणी टीव्ही स्क्रीन बसवण्यात आले आहेत. चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे.
बस स्थानक स्वच्छ राहण्यासाठी ठीकठिकाणी डस्ट बिन ठेवण्यात आले आहेत. तर कंपाऊंडवर सुंदर अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामुळे प्रवाश्यांचे मन रमून जाते. हिरकणी कक्ष, पोलीस चौकी, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्थाकरण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मे रोजी एसटी स्थानकांबाबतच्या मोहिमेची घोषणा केली. दर दोन महिन्यांनी स्थानकांचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार, राज्यातील ५८१ पैकी ५६० स्थानकांचे मे आणि जून महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले.त्यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रवाशांना वर्षभर स्वच्छ आणि सुंदर प्रवास करता यावा यासाठी राज्य सरकारने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ ,सुंदर बस स्थानक अभियान सुरू केले आहे.
ML/KA/SL
12 Aug 2023