दालमिया सिमेंट कंपनीत कन्वेयर बेल्टला आग

चंद्रपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नारंडा येथील डालमीया सिमेंट उद्योगात कनवेयर बेल्टला आग लागली. आग वेगाने पसरत असल्यामुळे कंपनीत गोंधळाचे वातावरण पसरले. या कन्व्हेअर बेल्टने सिमेंटसाठी लागणाऱ्या दगडाची आवक केली जाते. मात्र तो बेल्ट अधिक गरम झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच लागलीच अग्निशमन दलाच्या वाहनाने पाचारण केल्याने आग आटोक्यात आली. यात मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
ML/KA/SL
12 Aug 2023