Month: August 2023

राजकीय

तलाठी भरती परीक्षेबाबत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई दि.23( एम एमसी न्यूज नेटवर्क): राज्य शासनाच्या तलाठी भरती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे व झालेल्या प्रकारांबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना केली आहे. शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी परीक्षा घेतल्या जात आहेत मात्र […]Read More

राजकीय

कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरुच

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्याचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही एवढे निर्दयी लोक सत्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि सरकार आता नाफेड मार्फत केवळ २ लाख टन कांदा २४१० रुपयाने खरेदी करणार आहे. या […]Read More

देश विदेश

१८ वर्षीय प्रज्ञानंदन विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत

बाकू (अझरबैजान), दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाला पराभवाचा धक्का देत काल विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदासाठी त्याला अव्वल जागतिक बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला नमवण्याची किमया साधावी लागेल. पारंपरिक पद्धतीचे दोन डाव बरोबरीत सुटल्यानंतर ‘टायब्रेकर’मध्ये गेलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत […]Read More

बिझनेस

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक DSK तब्बल ५ वर्षांनी तुरुंगाबाहेर

पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. तब्बल पाच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना आज जामीन मिळाला आहे. गुंतवणूकदारांची ८०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी २०१८मध्ये डीएसके, त्यांच्या पत्नी, मुलगा, मेव्हणे, जावई आणि कंपनीतीली लोकांना अटक करण्यात आलेली होती. ज्या कायद्यांतर्गत कारवाई झाली त्या कायद्यान्वये किती काळ तुरुंगात ठेवता, […]Read More

ट्रेण्डिंग

JNPT बंदरात १५० कंटेनर कांदा सडण्याच्या बेतात

नवी मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने आज दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरीही कांदा उत्पादकांच्या विद्यमान समस्या यामुळे सुटणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने याचा मोठा फटका राज्यातील शेतकरी वर्गाला बसू लागला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) बंदरात […]Read More

देश विदेश

हा प्रसिद्ध क्रिकेटपटू झाला निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणूकीची जय्यद तयारी सुरु आहे. मतदारांचा टक्का वाढावा म्हणून आयोगाकडून विशेष प्रयत्न केले जातात. निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरची उद्यापासून निवडणूक आयोगाचा (EC) “नॅशनल आयकॉन” म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तेंडुलकर आणि निवडणूक पॅनल यांच्यात उद्या दिल्लीत […]Read More

सांस्कृतिक

कोकणातील या शिवमंदिरात ड्रेसकोड लागू

सिंधुदुर्ग, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रावण महिना सुरु झाल्यामुळे राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. मंदीर शिष्टाचाराचा आणि सभ्यतेचा भाग म्हणून गेल्या काही काळापासून बऱ्याच देवस्थानांकडून भाविकांनी मंदिरात विशिष्ट प्रकारची वस्त्रेच परिधान करावीत असा नियम करण्यात येत आहे. असाच नियम आता दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या ट्रस्टने […]Read More

विदर्भ

पाकिस्तानचे झेंड्यांची विक्री करणाऱ्या अमेझॉन कंपनीची तोडफोड

नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानचे झेंडे ऑर्डर करा 24 तासात तुम्ही तुम्हाला घरपोच देऊ अशा पद्धतीने ॲमेझॉन कडून पाकिस्तानचे झेंडे विक्री केल्या जात असल्यामुळे आज नागपुरात मनसे सह विविध सामाजिक संघटनातर्फे संताप व्यक्त करण्यात आला… यासंदर्भात अमेझॉन कंपनी आणि पोलिसांना निवेदन सुद्धा देण्यात आले होते मात्र तरीही ही विक्री थांबवण्यात आली नसल्याने […]Read More

राजकीय

पावसाने दिली ओढ, मुख्यमंत्र्यानी घेतला आढावा

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश […]Read More

राजकीय

कांदा खरेदी नाफेड करणार ही तर शेतकऱ्यांची दिशाभूल

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचा संताप पाहून घाबरलेल्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धाव घेऊन नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार असल्याचे सांगत आहेत. नाफेडमार्फत कांदा खरेदी ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. केंद्र सरकारने वाढवलेले ४० टक्के निर्यात शुल्क […]Read More