प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक DSK तब्बल ५ वर्षांनी तुरुंगाबाहेर

पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. तब्बल पाच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना आज जामीन मिळाला आहे. गुंतवणूकदारांची ८०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी २०१८मध्ये डीएसके, त्यांच्या पत्नी, मुलगा, मेव्हणे, जावई आणि कंपनीतीली लोकांना अटक करण्यात आलेली होती. ज्या कायद्यांतर्गत कारवाई झाली त्या कायद्यान्वये किती काळ तुरुंगात ठेवता, येतं हे कोर्टाने पाहिलं. डीएसकेंच्या १३५ मालमत्ता आहेत. गृह प्रकल्प, मोकळ्या जागा, ड्रीम सीटी ३०० एकराचा प्रकल्प असेल यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र गुंतवणूकदारांचा एक रुपयाही परत मिळालेला नाही.त्यांचे गुंतवणूकदार हे बहुसंख्येने मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिक आहेत.
डीएसकेंकडे वेगवेगळ्या बँकांचे १२०० कोटींचं कर्ज आहे. यामध्ये वेगवेगळ्या बँकांचा सहभाग आहे. एका राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्याला या प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि लिलाव करुन गुंतवणूकदारांचे पैसे द्यावेत, अशी मागणी होत आहे.
आज डीएसकेंचे फोटो माध्यमांच्या हाती आले आहेत. त्यांना तब्बल पाच वर्षांनंतर जामीन मंजूर झालेला आहे. यापूर्वीही त्यांना जामीन मंजूर झालेला होता, परंतु त्यांची सुटका झालेली नव्हती. आता डीएसके बाहेर आलेले असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी ते कोणती स्ट्रॅटेजी वापरणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
SL/KA/SL
22 Aug 2023